IND vs AUS Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: भारत का ऑस्ट्रेलिया? वर्ल्ड कपमध्ये कोण सरस, 1975 पासूनची आकडेवारी काय सांगते?

IND vs AUS H2H Record in ODI: वनडे वर्ल्ड कप 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS H2H Record in ODI: वनडे वर्ल्ड कप 2023 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारताचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

भारतासाठी हा सामना सोपा असणार नाही, कारण ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघ आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया किती वेळा आमनेसामने आले आहेत आणि दोघांमध्ये कोणाचं पारडं जड आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

चला तर मग जाणून घेऊया वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल...

दोन्ही देशांमध्ये 12 सामने झाले आहेत

वनडे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघांमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाची गणना केली जाते. भारताने आतापर्यंत 2 वर्ल्ड कप जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 वेळा वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहेत.

यावरुन ऑस्ट्रेलियाचा विजेतेपदांचा रेकॉर्ड भारतापेक्षा खूपच चांगला आहे. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप सामन्यांचे समीकरणही तसेच आहे का?

वर्ल्ड कपमध्ये भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया 12 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत, तर भारताने 4 सामने जिंकले आहेत.

दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या वर्ल्ड कप सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) सर्वाधिक 359 धावा केल्या आहेत. तर वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वाधिक धावसंख्या 352 आहे.

त्याचवेळी, जर सर्वात कमी धावसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास, वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 125 धावसंख्या उभारली होती, तर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची किमान धावसंख्या 128 आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप सामन्यांची यादी

1983: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वर्ल्ड कप सामना 1983 मध्ये खेळला गेला. भारताने हा सामना 118 धावांनी जिंकला होता. याच वर्ल्ड कपमधील दुसरा सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 162 धावांनी पराभव केला होता.

1987: 1987 मध्येही दोन्ही देशांदरम्यान दोन सामने झाले. येथे एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने 1 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने 56 धावांनी विजय मिळवला होता.

1992: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1992 मध्ये पाचवा सामना खेळला गेला, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 1 धावसंख्येने पराभव केला होता.

1996: या हंगामात दोन्ही देशांमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 16 धावांनी पराभव केला होता.

1999: दोन्ही देशांमधील सातवा सामना 1999 मध्ये झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने हा सामना 77 धावांनी जिंकला होता.

2003: या मोसमात दोन देशांदरम्यान दोन सामने झाले होते. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामने जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना 125 धावांनी, तर दुसरा सामना 9 विकेटने जिंकला होता.

2011: वर्ल्ड कपमधील 10 वा सामना 2011 मध्ये दोन्ही देशांदरम्यान खेळला गेला, ज्यामध्ये भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला होता.

2015: वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला हा 11वा सामना होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 95 धावांनी जिंकला होता.

2019: या वर्ल्ड कपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT