Axar Patel | R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd Test: दुसऱ्या दिवशी कांगारू वरचढ! पण अक्षर-अश्विन टीम इंडियासाठी संकटमोचक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले असून त्यांना आघाडीही मिळाली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्याचा शनिवारी (18 फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. दरम्यान, दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर वर्चस्व गाजवल्याचे दिसून आले.

दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकात 1 बाद 61 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड 40 चेंडूत 39 धावांवर आणि मार्नस लॅब्युशेन 19 चेंडूत 16 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला 6 धावांवर बाद केले.

तत्पूर्वी भारताने दुसऱ्या दिवशी 10 व्या षटकापासून आणि बिनबाद 21 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. मात्र भारताने वरच्या फळीतील आणि मधल्या फळीतील विकेट्स स्वस्तात गमावल्या. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायननेच भारताच्या पहिल्या चारही विकेट्स घेतल्या.

त्याने सर्वात आधी केएल राहुलला 18 व्या षटकात 17 धावांवर खेळत असताना पायचीत पकडले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बाद करत भारतीय संघाला दुहेरी धक्के दिले. तसेच त्याने पुनरागमन करताना चांगल्या लयीत दिसणाऱ्या श्रेयस अय्यरलाही फिरकीच्या जाळ्यात ओढले. अय्यर ४ धावा करून माघारी परतला.

त्यामुळे भारतीय संघ एका क्षणी 4 विकेट्स गमावून 66 धावांवर खेळत होता. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची अर्धशतकी भागीदारी झाली असताना विराटला ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर मॅथ्यू कुहनेमनने 50 व्या षटकात 44 धावांवर बाद केले.

दरम्यान, विराटची ही विकेट काहीशी वादग्रस्त ठरली. कारण तो जेव्हा पायचीत झाला, तेव्हा चेंडू बॅट आणि पॅड पैकी कशाला आधी लागला, हे समजणे कठीण झाले होते. पण मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिलेले असल्याने त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

विराट पाठोपाठ रविंद्र जडेजाने 26 धावांवर विकेट गमावली. विराट आणि जडेजा यांनी ५९ धावांची भागीदारी केली होती. श्रीकर भरतही फार काही करू शकला नाही. त्याने ६ धावांवर विकेट गमावली. त्यामुळे भारताची स्थिती 7 बाद 139 धावा अशी होती.

मात्र त्यानंतर अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी भारताचा डाव सावरलाच नाही, तर 114 धावांची महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी साकारली. पण ही भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. त्याने अश्विनला 37 धावांवर बाद केले.

यानंतर भारताला डाव 83.3 षटकात 262 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 1 धावेची आघाडी मिळाली. अक्षर 115 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले.

ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच मॅथ्यू कुहनेमन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. त्याचबरोबर पॅट कमिन्सने एक विकेट घेतली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT