Virat Kohli IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या मैदानावर फलंदाजीसाठी उतरताच विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे. विराटने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी केवळ महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेच केला होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 डावात फलंदाजी करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटपूर्वी केवळ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 किंवा त्याहून अधिक डावात फलंदाजी केली आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये 41 आणि टी-20 मध्ये 21 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्याचवेळी, त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील ही 38वी खेळी आहे.
सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 डावात फलंदाजी केली आहे. या डावांमध्ये सचिन तेंडुलकरने 49.68 च्या सरासरीने 6707 धावा केल्या. यादरम्यान सचिन तेंडुलकरच्या बॅटने 31 अर्धशतके आणि 20 शतके झळकली आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने (Virat Kohli) या 100 डावांमध्ये 51+ च्या सरासरीने 4500 हून अधिक धावा केल्या आहेत.
उभय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 2019 पासून त्याने कसोटीत एकही शतक झळकावलेले नाही. त्याचबरोबर या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुलसारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. ऍशेसमध्ये विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.