Shreyas Iyer  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: श्रेयस अय्यर अर्धी टीम इंडिया आऊट झाल्यावरही का नाही आला बॅटिंगला? जाणून घ्या खरं कारण

India vs Australia: भारताने 5 विकेट्स गमावल्यानंतरही बॅटिंगला आला नव्हता, त्यामागचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Pranali Kodre

Shreyas Iyer Back injury: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत, तर भारतानेही चौथ्या दिवशी पहिल्या डावात 400 धावांचा टप्पा पार केला आहे.

मात्र, भारताने पाच विकेट्स गमावल्यानंतरही श्रेयस अय्यर फलंदाजीला आला नव्हता. खरंतर श्रेयस मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्यामुळे तो कसोटीत बऱ्याचदा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. मात्र, तो चालू कसोटीत लवकर फलंदाजीला का आला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला.

पण, आता असे समोर आले आहे की श्रेयसला सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच पाठीमध्ये वेदना जाणवत होत्या. त्याच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे की 'श्रेयस अय्यरने तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर पाठीमध्ये वेदना होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आले आहे आणि त्याच्या दुखापतीवर सध्या बीसीसीआय मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे.'

मात्र, बीसीसीआने श्रेयस या सामन्यात पुढे खेळणार आहे की नाही, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

श्रेयसला पाठीच्या दुखापतीचा त्रास होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यात खेळताना पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेला मुकावे लागले होते. तसेच याच दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता.

त्याने त्याच्या या दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कामही केले. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन केले होते. मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. त्याने या कसोटी मालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत मिळून ३२ धावा केल्या आहेत.

श्रेयसची कारकिर्द

श्रेयसने आत्तापर्यंत 9 कसोटी सामन्यांमध्ये 666 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 42 वनडे सामन्यांमध्ये 1631 धावा केल्या आहेत. त्याने 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून 1043 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतीत तीन शतके केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT