Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: रनमशीनचा नवा पराक्रम! भारतात 50 व्या कसोटीत फिफ्टी ठोकत 'हा' रेकॉर्ड नावावर

India vs Australia: विराट कोहलीने भारतात 50 वा कसोटी सामना खेळताना नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: शनिवारी (११ मार्च) भारता विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याचा तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अर्धशतक करून नाबाद आहे. याच खेळीदरम्यान विराटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तो या डावात खेळताना चांगल्या लयीत दिसत होता. त्याने काही चांगले शॉट्सही खेळले.

याचदरम्यान त्याने 87 व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकला आणि भारतात कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला. त्याला भारतात खेळताना कसोटीमध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी या सामन्यापूर्वी 42 धावांची गरज होती. त्याने या धावा पूर्ण करताच मोठा विक्रमही नावावक केला.

विराट भारतामध्ये खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांनी असा कारनामा केला आहे.

विशेष म्हणजे विराटचा हा भारतातील 50 वा कसोटी सामना होता. त्याने भारतात 50 कसोटी सामने खेळताना 77 डावात 4000 धावांचा टप्पा पार केला आहे.

भारतात सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज

7216 धावा - सचिन तेंडुलकर (94 सामने)

5598 धावा - राहुल द्रविड (70 सामने)

5067 धावा - सुनील गावसकर (65 सामने)

4656 धावा - विरेंद्र सेहवाग (52 सामने)

4000 धावा* - विराट कोहली (50 सामने)

विराटचं अर्धशतक

अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 480 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला होता. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 74 धावांनी सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात केली, पण रोहित 35 धावांवर बाद झाला.

त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी 113 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सारवला. मात्र, पुजारा ४२ धावा करून बाद झाला. त्याआधी गिलने शतक पूर्ण केले होते. पुजारा बाद झाल्यानंतर विराटने गिलला चांगली साथ दिली. मात्र गिल 128 धावांवर बाद झाला.

पण नंतर विराट आणि रविंद्र जडेजाने तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाला यश मिळू दिले नाही. त्यामुळे भारताच्या तिसऱ्या दिवसाखेर 99 षटकात 3 बाद 289 धावा झाल्या. भारताकडून विराट कोहली 59 धावांवर आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर नाबाद आहे. दरम्यान, अद्याप भारतीय संघ 191 धावांनी पिछाडीवर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT