Virat Kohli: फिल्डींग करतानाच किंग कोहलीला लागली भूक? अहमदाबाद कसोटीतील Video Viral

भारत वि. ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या अहमदाबाद कसोटीदरम्यान क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवल्याचे दिसले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पहिल्या दिवशी संपूर्ण दिवस क्षेत्ररक्षण करावे लागले. याचदरम्यानचा, विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले. यावेळीचा २२ व्या षटकादरम्यानचा व्हिडिओ सध्या चर्चे आहे. हे षटक सुरू होण्याच्या काही क्षण आधी विराट कोहली काहीतरी खाताना दिसला होता.

Virat Kohli
Virat Kohli: बापरे! विराट कोहलीला 50 रुपयांसाठी धुतले होते, दिग्गज खेळाडूने सांगितला किस्सा

तो प्रोटीन बार असल्यासारखे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान मार्नस लॅब्युशेनने स्ट्राईक घेतल्यानंतर आणि मोहम्मद शमी गोलंदाजी करण्यासाठी गेला असताना लगेचच विराटने ते पॅकेट खिशात ठेवले.

त्यानंतर शमीने पहिला चेंडू टाकल्यानंतर विराटने तो प्रोटीन बार त्याच्या शेजारी स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरलाही ऑफर केला. त्यानंतर श्रेयसने तो घेतला. पण नंतर लगेचच त्याने तो खिशात टाकला शमी दुसरा चेंडू टाकण्यासाठी गेला होता. दरम्यान शमीने याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लॅब्युशेनला 3 धावांवर त्रिफळाचीत केले.

Virat Kohli
Anushka Sharma-Virat Kohli: अनुष्का-विराटने घेतले ‘महाकालेश्वराचे’ दर्शन, विवेक अग्निहोत्रींचे खोचक ट्वीट; म्हणाले...

सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगायचे झाल्यास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. त्याला पहिल्या दोन विकेट्स गेल्यानंतर स्टीव्ह स्मिथने चांगली साथ देताना 79 धावांची भागीदारी केली. पण स्मिथला रविंद्र जडजाने 38 धावांवर बाद केले.

पण त्यानंतर ख्वाजाला कॅमेरॉन ग्रीनने दमदार साथ दिली. पहिला दिवस संपला तेव्हा ख्वाजा 251 चेंडूत 104 धावांवर नाबाद होता, तर कॅमेरॉन ग्रीन 49 धावांवर नाबाद होता. तसेच ऑस्ट्रेलियाने 4 बाद २५५ धावा उभारल्या.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दिल्लीत छोले-कुलचावर विराटने मारला ताव

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली कसोटीदरम्यान विराटने छोले-कुलचावर ताव मारला होता. ड्रेसिंग रुममध्ये द्रविडबरोबर तो बसला असताना त्याच्यासाठी छोले-कुलचाची डिलिव्हरी आली असतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com