Virat Kohli | Axar Patel Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: अहमदाबाद कसोटीत घडला इतिहास! भारतीय फलंदाजांनी केला आजपर्यंत कधीही न घडलेला पराक्रम

Ahmedabad Test: भारतीय फलंदाजांनी अहमदाबाद कसोटीदरम्यान पहिल्या डावात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना होत आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात 571 धावा उभारत 91 धावांची आघाडीही घेतली. या डावादरम्यान भारतीय संघाने मोठा विक्रमही केला आहे.

या डावात भारताकडून पहिल्या विकेटपासून 6 व्या विकेटपर्यंत 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी झाली. त्यामुळे भारताच्या क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच घडले की कसोटीमध्ये एका डावात पहिल्या सहाही विकेटसाठी भारताने 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी भारतीय संघाला असा विक्रम कधी करता आला नव्हता.

या डावात पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 74 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर रोहित 35 धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात 113 धावांची भागीदारी झाली. पुजारा ही भागीदारी करून 42 धावांवर बाद झाला.

यानंतर गिल आणि विराट कोहली यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, ही भागीदारी गिल 128 धावांची शतकी खेळी करून बाद झाल्याने तुटली. पण त्यानंतर विराट आणि रविंद्र जडेजा यांनी चौथ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मात्र जडेजा 28 धावांवर बाद झाला.

यानंतर केएस भरत आणि विराट यांनी पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. भरत 44 धावा करून बाद झाला. यानंतर मात्र विराटला अक्षरने दमदार साथ दिली. या दोघांमध्ये भारताच्या डावातील सर्वोच्च भागीदारी झाली. विराट आणि अक्षर यांनी 6 व्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारी केली. पण अक्षर 79 धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली.

यानंतर भारताचा डाव लगेचच 571 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे फलंदाजीला आला नव्हता. या डावात विराटने सर्वोच्च 186 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान संघाने केलाय असा विक्रम

दरम्यान कसोटीच्या एका डावात पहिल्या सहाही विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम भारतापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानने केला आहे. ऑस्ट्रेलियाने 1960 साली वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात हा पराक्रम केला होता, तर पाकिस्तानने 2015 साली बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

Goa Drug Case: कपड्यांखाली लपवले होते 3 कोटींचे ड्रग्स! मोपा विमानतळावरून विदेशी पर्यटकाला अटक

MI VS RCB: 6,4,6,4... नॅडिन डी क्लार्कची झुंजार खेळी, आरसीबीनं मुंबईच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास Watch Video

SCROLL FOR NEXT