IND vs AUS: फक्त क्रिकेटमध्येच नाही, तर हॉकीतही टीम इंडिया ऑस्ट्रेलियावर भारी; मिळवला दणदणीत विजय

Hockey India: हॉकी प्रो लीगमध्ये रविवारी भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर विजय मिळवला.
Hockey India
Hockey IndiaDainik Gomantak

India vs Australia Hockey: हॉकी प्रो लीगमध्ये रविवारी भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघावर विजय मिळवला. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 5-4 अशा गोलफरकाने पराभूत केले. हा भारताचा सलग दुसरा विजय आहे.

भारताने शुक्रवारी विश्वविजेत्या जर्मनीला 3-2 फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर आता भारताने ऑस्ट्रेलियालाही पराभवाची धूळ चारली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल्सची हॅट्रिक साधली. तसेच जुगराज सिंग आणि सेल्वम कार्थी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून जोशुआ बेल्ट्ज, की विलॉट, बेन स्टेन्स, आरान झालेवस्की यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Hockey India
Hockey World Cup नंतर भारतीय टीमच्या प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' सदस्यांनीही सोडली साथ

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघात चांगलीच चूरस दिसली. ऑस्ट्रेलियाकडून जोशुआने पहिल्याच क्वार्टरमध्ये तिसऱ्या मिनिटाला गोल केला होता. त्यानंतर भारताने बराच वेळ गोल करण्याचा प्रयत्न केला. अखेर पहिल्या क्वार्टरच्या अखेरच्या क्षणांमध्ये भारताला यश मिळाले. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर 14 आणि 15 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

यानंतर ही आघाडी भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्येही कायम ठेवण्यात यश मिळवले. सामन्याच्या 18 व्या मिनिटाला एस कार्थीने भारतासाठी पेनल्टी स्ट्रोक मिळवला, ज्यावर जुगराज सिंगने कोणतीही चूक न करताना भारताचा तिसरा गोल नोंदवला. कार्थीने पुढेही त्याचा खेळ चांगला सुरू ठेवत 26 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला 4-1 असे आघाडीवर आणले.

Hockey India
Hockey World Cup 2023: जर्मनी तिसऱ्यांदा जगज्जेता! गतविजेत्या बेल्जियमचा फायनलमध्ये पराभव

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पुनरागमनाचा प्रयत्न झाला. त्यांनी पेनल्टी कॉर्नर मिळवण्याचे प्रयत्न केले. पण अखेर की विलोटने 43 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी कमी केली. तसेच अखेरच्या क्वार्टरमध्ये 10 मिनिटेच शिल्लक असताना दोन्ही संघांनी एकमेकांना तगडी लढत दिली.

ऑस्ट्रेलियाच्या बेन स्टेन्सने 53 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत 4-3 अशा रोमांचक स्थितीत सामना आणला. पण भारतानेही चांगली लढत दिली. 56 व्या मिनिटाला भारताला हार्दिक आणि विष्णूकांतच्या प्रयत्नांमुळे पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्यावर हरमनप्रीतने ड्रॅगफ्लिक करत भारताला 5-3 अशा आघाडीवर नेले.

पण पुढच्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या आरान झालेवस्कीने पेनल्टी कॉर्नरवर ऑस्ट्रेलिचा चौथा गोल नोंदवला. 59 व्या मिनिटालाही ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र यावेळी भारतीय बचावफळीने त्यावर गोल होऊ दिला नाही. याबरोबरच भारताने हा सामना जिंकला.

भारताचा हा हॉकी प्रो लीगमधील 2022-23 हंगामातील सहा सामन्यांमधील चौथा विजय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com