Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाला मिळाला उपकर्णधार? अहमदाबाद कसोटीतील 'त्या' DRS नंतर चर्चांना उधाण

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीतील एका डीआरएसनंतर भारतीय कसोटी संघाच्या उपकर्णधाराबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व ठेवलं. मात्र, असे असले तरी दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारताचे पुनरागमन झाले. दरम्यान, याच सत्रात झालेल्या एका घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

या सामन्यात पहिल्या दोन्ही सत्रात उस्मान ख्वाजा आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी दरमदार कामगिरी करत द्विशतकी भागीदारी पूर्ण केली होती. दरम्यान, दुसऱ्या सत्रात्या अखेरीस आर अश्विनने ग्रीनने 114 धावांवर बाद केले, तसेच एकूण तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर अखेरच्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने ख्वाजाला पायचीत पकडले.

पण, पंचांनी आधी ख्वाजाला नाबाद दिले होते. पण भारताने त्यावर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावेळी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मैदानातून बाहेर होता.

त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी संघव्यवस्थापनाकडून चेतेश्वर पुजाराकडे दिली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुजाराने भारतीय संघ डीआरएस घेणार आहे, हा निर्णय पंचांना सांगितला होता.

पुजारा होणार उपकर्णधार?

दरम्यान, रोहितच्या अनुपस्थितीत पुजाराने डीआरएसचा निर्णय घेतल्याने त्याच्याकडे भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात येणार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती.त्यावेळी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. तसेच या पदावर कोणत्याच खेळाडूची नियुक्ती झाली नव्हती. त्यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे उपकर्णधारपद कोणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला होता. पण आता कदाचीत भारतीय संघ व्यवस्थापनाने या प्रश्नाचे उत्तर चेतेश्वर पुजाराच्या रुपात शोधले असण्याची शक्यता आहे.

ख्वाजा-ग्रीनची शतके

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 167.2 षटकात सर्वबाद 480 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली. तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तळात टॉड मर्फीने 41 आणि नॅथन लायनने 34 धावांची खेळी केली.

भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT