India vs Australia, T20 Series ANI
क्रीडा

IND vs AUS: वर्ल्डकप फायनलनंतर पुन्हा भिडणार भारत-ऑस्ट्रेलिया, पाहा T20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

India vs Australia, T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 23 नोव्हेंबरपासून टी20 मालिका सुरु होणार आहे.

Pranali Kodre

India vs Australia T20I Series Schedule:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार नुकताच पार पडला. 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादला वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झाला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने जिंकत सहाव्यांदा वनडे वर्ल्डकपवर नाव कोरले.

दरम्यान, आता या वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यानंतर चारच दिवसात पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमने-सामने येणार आहेत. या दोन संघात 23 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.

पुढीलवर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही टी20 मालिका महत्त्वाची असणार आहे.

प्रमुख खेळाडूंना विश्रांती

या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातील मात्र अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाचा भाग राहिलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा या तीनच खेळाडूंचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघातीलही अनेक अनुभवी खेळाडू वर्ल्डकप 2023 नंतर मायदेशी परतले आहेत.

यामध्ये पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड या तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांचाही समावेश आहे, तसेच डेव्हिड वॉर्नर, ऍलेक्स कॅरी, मार्नस लॅब्युशेन असे खेळाडूही मायेदशी गेले आहेत.

पण स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड आणि ऍडम झम्पा हे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेले खेळाडू भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही ऑस्ट्रेलिया संघात सामील आहेत.

अशी आहे टी20 मालिका

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणमला होणार आहे, त्यानंतर 26 आणि 28 नोव्हेंबर रोजी दुसरा आणि तिसरा टी20 सामना होईल. डिसेंबरच्या 1 आणि 3 तारखेला अनुक्रमे चौथा आणि पाचवा टी20 सामना रंगणार आहे. हे पाचही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होतील.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • 23 नोव्हेंबर - पहिला टी20 सामना, विशाखापट्टणम

  • 26 नोव्हेंबर - दुसरा टी20 सामना, तिरुवनंतपुरम

  • 28 नोव्हेंबर - तिसरा टी20 सामना, गुवाहाटी

  • 1 डिसेंबर - चौथा टी20 सामना, नागपूर

  • 3 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, हैदराबाद

असे आहेत टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

    (श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यात उपकर्णधार असेल.)

  • ऑस्ट्रेलिया संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेडस जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT