David Warner withdrawn from Australia squad for T20I series against India:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा नुकतीच 19 नोव्हेंबर रोजी संपली. आता या स्पर्धेनंतर चारच दिवसात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 23 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होत आहे. विशेष म्हणजे याच दोन संघात वर्ल्डकपचा अंतिम सामनाही खेळला गेला, ज्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.
दरम्यान, गेल्याच महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा भाग असलेल्या सात खेळाडूंनाही संधी देण्यात आली होती. मात्र, आता या मालिकेतून अनुभवी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने माघार घेतली आहे.
वॉर्नर वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो भारताविरुद्ध टी20 मालिका खेळणार नाही. दरम्यान, तो नसला, तरी स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस, ट्रेविस हेड आणि ऍडम झम्पा हे विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असलेले खेळाडू भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही ऑस्ट्रेलिया संघात सामील आहेत.
दरम्यान, वॉर्नर पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध अखेरची कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे कारण त्याने पुढील वर्षीचा केंद्रिय करार करण्यासाठी नकार दिला आहे. पण असे असले तरी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र तो खेळणे कायम करू शकतो.
तो पुढीलवर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणारा टी20 वर्ल्डकप खेळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. तसेच 2025 साली होणारी चॅम्पियन्स ट्रॉफीही खेळू शकतो.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार वॉर्नरच्या ऐवजी अष्टपैलू ऍरॉन हार्डीला भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी दिली आहे. त्याने वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात क्रिकेट खेळले आहे.
याशिवाय स्पेन्सर जॉन्सन दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेसाठी त्याच्या जागेवर केन रिचर्डसनला संधी देण्यात आली आहे.
असा आहे भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - मॅथ्यू वेड (कर्णधार), ऍरॉन हार्डी, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, सीन ऍबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेविस हेडस जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.