India vs Australia  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: अहमदाबाद कसोटीसाठी तयार होतायेत दोन खेळपट्ट्या? Photo आलेत समोर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून चौथा कसोटी सामना खेळवला जाणार असून यासाठी अहमदाबादमधील स्टेडियममध्ये खेळपट्टी तयार करतानाचे काही फोटो समोर आले आहेत.

Pranali Kodre

India vs Australia, 4th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले तिन्ही सामने पूर्ण झाले असून आता चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी खेळपट्टीबद्दल बरीच चर्चा रंगली आहे.

या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात वापरलेल्या खेळपट्ट्यांबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. या तिन्ही सामन्यात फिरकीपटूंनी मोठी मदत मिळाली. तसेच हे तिन्ही सामने केवळ तीन दिवसात संपले.

त्यामुळे खेळपट्टी कसोटी सामन्यांसाठी योग्य होती की नाही, याबद्दल अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. त्यातच इंदोरला झालेल्या तिसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब असे मुल्यांकन देण्यात आले.

त्यामुळे सध्या अहमदाबादमध्ये कशी खेळपट्टी असेल, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. पण अशातच अहमदाबादमध्ये असणाऱ्या काही पत्रकारांकडून समोर आलेल्या फोटोंमधून कदाचीत या कसोटीसाठी दोन खेळपट्ट्या तयार करण्यात येत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातून अंतिम खेळपट्टीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

फोटोंमध्ये दिसते की दोन खेळपट्ट्यांवर कव्हर टाकण्यात आले आहे, तसेच या खेळपट्ट्यांवर गवत दिसून येत आहे. आता खेळपट्टी नक्की कोणती वापरण्यात येणार याचा खुलासा सामन्याच्या दिवशीच होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाची

दरम्यान, या कसोटी मालिकेत भारतीय संघ आघाडीवर असल्याने मालिकेतील पराभव टाळण्यासाठी अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाला विजय आवश्यकच आहे. तसेच भारतीय संघाला मालिका विजयाबरोबर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात थेट प्रवेश करण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आधीच पोहचले आहेत. आता भारताला अंतिम सामन्यात स्थान पक्के करण्यासाठी अहमदाबाद कसोटी जिंकावी लागणार आहे. हा सामना भारतीय संघ पराभूत झाला किंवा अनिर्णित राहिला, तर भारताला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT