चर्चा तर होणारचं! IND vs AUS कसोटी सामन्यादरम्यान सर्वांचे लक्ष PM मोदींकडे, जाणून घ्या

IND vs AUS 4th Test: दुसरीकडे, या सामन्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs AUS 4th Test Narendra Modi Stadium Ahmedabad: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.

यासाठी दोन्ही संघ अहमदाबादमध्ये पोहोचले असून सध्या तयारी जोरात सुरु आहे. दुसरीकडे, या सामन्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर असलेल्या स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हे पहिल्यांदाच घडत आहे. पीएम मोदी 8 मार्च रोजी रात्री 8.30 ते 9.00 च्या सुमारास अहमदाबादला पोहोचणार असल्याचे कळते. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान संध्याकाळी 4 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहेत.

Team India
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेदरम्यान आली 'ही' धक्कादायक बातमी, या व्यक्तीच्या...

दुसरीकडे, सामन्याच्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला सकाळी 8.30 वाजता पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलिया पीएम स्टेडियमवर एकत्र असतील, जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलियाचे कर्णधार टॉससाठी मैदानाच्या मध्यभागी पोहोचतील तेव्हा दोन्ही देशांचे पंतप्रधान देखील उपस्थित राहतील. यादरम्यान काही सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पीएम मोदी कॉमेंट्री बॉक्समध्येही जाणार आहेत

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान कॉमेंट्री बॉक्समध्ये पोहोचतील आणि इंग्रजीमध्ये समालोचन करतील, या दरम्यान पीएम मोदी देखील त्यांच्यासोबत असतील.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपली प्रतिक्रिया देतील, अशी शक्यता आहे. मुख्य मैदानाबाहेर पॅव्हेलियनजवळ एक स्टेज तयार करण्यात आला आहे, जिथे दोन्ही देशांचे पंतप्रधान भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भेटणार असल्याची माहिती आहे.

Team India
IND vs AUS: फक्त ऑस्ट्रेलियाच नाही, मुंबई इंडियन्सलाही धक्का! 'हा' धाकड खेळाडू भारत दौऱ्यातून बाहेर

स्टेडियमच्या बाहेर व्हीआयपी गेटवर मोठे पोस्टर चिकटवले आहे

दरम्यान, स्टेडियमच्या बाहेर VIPL गेटवर एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे, ज्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा मोठा फोटो आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचे फोटोही त्यावर आहेत.

त्यावर लिहिले आहे की, क्रिकेटच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया आणि भारताची 75 वर्षांची मैत्री आहे. यामध्ये भारताचे दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर, तसेच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), व्हीव्हीएस लक्ष्मण, रविचंद्रन अश्विन, कर्णधार रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचे मार्क टेलर, सर डॉन ब्रॅडमन, यांचा फोटो आहे. स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स आणि अनेक खेळाडूंचे फोटो आहेत.

Team India
IND vs AUS: स्मिथ की कमिन्स, चौथ्या कसोटीत कोण करणार ऑस्ट्रेलियाची 'कॅप्टन्सी'? मोठी अपडेट आली समोर

स्टेडियमची क्षमता 1.25 लाखांपेक्षा जास्त आहे

अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, येथील क्षमता एक लाख 35 हजारांच्या जवळपास आहे. सर्व तिकिटांची विक्री झाली असून पहिल्या दिवशी स्टेडियम खचाखच भरले जाण्याची माहिती आहे.

चार सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना असेल आणि मालिकेचा निकाल कसा लागेल हे त्यावरुनच ठरेल, त्यामुळेच चाहते मोठ्या संख्येने स्टेडियमवर पोहोचणार आहेत.

तसेच, पोस्टर्स आणि बॅनर्ससह भारतीय चाहते इथे पोहोचतीलच, शिवाय ऑस्ट्रेलियन चाहतेही मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. हा सामना अतिशय रंजक असेल आणि दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आपली सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, या सामन्यात अनेक नवे विक्रमही होण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com