Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: इंदूर कसोटीत टीम इंडिया चूकली कुठे? जाणून घ्या पराभवाची 4 कारणे

इंदूर कसोटी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला केवळ सव्वा दोन दिवसात पराभूत केले आहे. या पराभवामागे काय कारणे असू शकतात याचा आढावा घेऊ.

Pranali Kodre

India vs Australia: शुक्रवारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला. इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात देखील प्रवेश मिळवला आहे.

तसेच चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील भारताची आघाडी ऑस्ट्रेलियाने आता 2-1 ने कमी केली आहे. दरम्यान केवळ सव्वा दोन दिवसातच भारतीय संघाला या सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. भारताला हा मायदेशात दोन वर्षांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या या पराभवाची नक्की काय कारणे होती हे थोडक्यात जाणून घेऊ

  • पहिल्याच दिवशी निराशा

खरंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी भारतीय संघाला खेळपट्टीवर फार काळ टिकूच दिले नाही. भारताचा पहिला डाव केवळ 109 धावांतच उरकला.

ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तसेच नॅथन लायनने 3 विकेट्स घेतल्या आणि टॉड मर्फीने 1 विकेट घेतली. त्यानंतर भारताकडून रविंद्र जडेजाने पहिल्या दिवशी 4 विकेट्स घेऊनही ऑस्ट्रेलियाने आघाडी घेण्यात यश मिळवले होते.

  • आपलीच योजना बुमरँग

खरंतर भारतीय संघ मालिकेच्या सुरुवातीपासूनच घरच्या परिस्थितीचा फायदा घेताना दिसत आहे. या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे तिसऱ्या सामन्यात भारताला ही गोष्ट फायदेशीर ठरली नाही.

उलट भारतीय संघासाठी तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाजीच डोकेदुखी ठरली. कारण ऑस्ट्रेलियाने या सामन्यात घेतलेल्या 20 विकेट्स पैकी 18 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या होत्या. यातही एकट्या नॅथन लायनच्याच 11 विकेट्स होत्या.

  • रोहितकडून नेतृत्वात चूका

रोहितला तसे चांगला कर्णधार म्हणून ओळखले जाते, मात्र या कसोटीत त्यांच्याकडून अनेक निर्णय चूकले. त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाने आधीच आघाडी घेतलेली असतानाही आर अश्विनकडे चेंडू सोपवण्यासाठी जवळपास 1 तास घालवला.

अखेर साधारण तासाभरानंतर चेंडू हाती आल्यानंतर अश्विननेच दुसऱ्या दिवशी पीटर हँड्सकॉम्बला बाद करत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. यानंतर केवळ 11 धावांत 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत भारताने संपवला होता. यात अश्विनच्या ३ विकेट्सचा समावेश होता. याशिवाय रिव्ह्यू घेण्यात, गोलंदाजांचे बदल, क्षेत्ररक्षण या विभागातही रोहितकडून चूका झालेल्या दिसल्या.

  • खराब फलंदाजी

या सामन्यात भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजी खेळण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसले. भारताचा पहिला डाव तर 109 धावांवरच संपला होता. या डावात विराटने सर्वाधिक 22 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावातही चेतेश्वप पुजाराचा (59) अपवाद वगळला भारतीय फलंदाज फार काही करू शकले नाहीत.

त्यामुळे दुसरा डावही 163 धावांत उरकला आणि पहिल्या डावातील 88 धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियासमोर केवळ 76 धावांचे आव्हान ठेवता आले. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान अवघ्या 18.5 षटकात 1 विकेट गमावत पूर्ण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT