Weekly Horoscope: सुवर्णसंधी चालून येणार, एप्रिलचा पहिला आठवडा 'या' राशींसाठी खासच; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य

April Rashi Bhavishya: एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रहांची स्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार असून त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर जाणवणार आहे.
Rashi Bhavishya | Horoscope
Rashi Bhavishya | HoroscopeDainik Gomantak
Published on
Updated on

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रहांची स्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार असून त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवर जाणवणार आहे. २ एप्रिल रोजी मंगळ ग्रह मीन राशीत प्रवेश करणार असून सूर्य, मंगळ आणि शनि यांची युती होऊन त्रिग्रही योग तयार होईल. तसेच सूर्य-मंगळ संयोगामुळे मंगलादित्य योगही निर्माण होणार आहे. या ग्रहयोगांमुळे काहींना अचानक लाभाचे संकेत तर काहींना सावध राहण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल, तसेच अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मेष

हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. कामात संयम ठेवा, वाद टाळा. कुटुंबीय समस्या आणि आर्थिक ताण जाणवू शकतो.

वृषभ

कामाचा ताण वाढेल, पण प्रयत्नांनी यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल. आरोग्य आणि नातेसंबंधांबाबत काळजी घ्या.

मिथुन

हा आठवडा शुभ ठरेल. प्रमोशन किंवा बदलाची शक्यता. व्यवसायात फायदा आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल.

कर्क

आपल्या क्षमतेनुसारच निर्णय घ्या. कामात अडचणी येऊ शकतात. घाई-गडबड टाळणे गरजेचे.

सिंह

उत्तम प्रगतीचा काळ. आर्थिक लाभ, मान-सन्मान वाढेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता.

कन्या

मध्यम परिणाम देणारा आठवडा. संवादात स्पष्टता ठेवा. कागदी कामे वेळेत पूर्ण करा.

Rashi Bhavishya | Horoscope
Rashi Bhavishya: आठवड्याची सुरुवात होणार दणक्यात! भगवान शंकर देणार आशीर्वाद; 'या' राशींचे बदलणार दिवस

तूळ

आठवड्याची सुरुवात शुभ. कामात यश आणि कौतुक मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील.

वृश्चिक

सुरुवातीला अडचणी, नंतर सुधारणा. मेहनत वाढेल. मानसिक ताण जाणवू शकतो.

धनु

धावपळीचा आठवडा. निर्णय घेताना घाई करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

Rashi Bhavishya | Horoscope
Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

मकर

सुरुवातीला अडथळे, नंतर व्यवसायात गती. संयम आणि धैर्य आवश्यक.

कुंभ

प्रवासातून लाभ. नवीन संपर्क तयार होतील. शिक्षणात यश मिळेल.

मीन

सावध राहण्याची गरज. खर्च वाढेल. कामात लहान चुका टाळा, आरोग्याकडे लक्ष द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com