Australia Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 3rd Test: ऑस्ट्रेलियाने इंदूरचं मैदान मारलं! भारताचा 9 विकेट्सने लाजीरवाणा पराभव

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने इंदूर कसोटीत भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd Test Match: शुक्रवारी (3 मार्च) ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने भारतीय संघाविरुद्ध इंदूर येथील होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात 9 विकेट्सने विजय मिळवला आहे. हा चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना होता. ऑस्ट्रेलियाने या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजय मिळवत आता मालिकेतील भारताची आघाडी 2-1 ने कमी केली आहे.

या सामन्यात भारतीय संघाने अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकात 1 विकेट गमावत 78 धावा करून पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड 49 धावांवर आणि मार्नस लॅब्यूशेन 28 धावांवर नाबाद राहिले.

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडून 76 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि ट्रेविस हेड ही सलामी जोडी उतरली होती. पण डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर आर अश्विनने ख्वाजाला शुन्यावर माघारी धाडले होते. पण नंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्यूशेन यांच्या जोडीने भारताला यश मिळू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करत भारताचा पहिला डाव 109 धावांवरच संपवला.

या डावात ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच नॅथन लायनने 3 आणि टॉड मर्फीने 1 विकेट घेतली होती. या डावात भारताकडून विराटो कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या होत्या.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या 60 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद 197 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण 88 धावांची आघाडी मिळाली होती. या डावात भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या, तर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

मात्र, भारतीय फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष काही करता आले नाही. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. पुजाराने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त केवळ श्रेयस अय्यरने 20 धावांचा टप्पा ओलांडला. श्रेयस अय्यरने 26 धावा केल्या.

भारताचा दुसरा डाव 60.3 षटकात 163 धावांवरच संपला आणि भारताने 88 धावांच्या पिछाडीमुळे ऑस्ट्रेलियासमोर अवघ्या 76 धावांच आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने 8 विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल मार्श आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून किंवा सामना अनिर्णित राखून भारताला मालिकेत विजय मिळवण्याची संधी आहे, तर ऑस्ट्रेलियाला मालिकेतील पराभव टाळण्यासाठी विजयच आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT