IND vs AUS 3rd Test: लाईव्ह सामन्यात रोहितने पुजारा-अक्षरवर चिडून वापरले अपशब्द? Video होतोय व्हायरल

इंदूर कसोटीत दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा चिडलेला दिसला होता. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Angry
Rohit Sharma AngryDainik Gomantak

India vs Australia Border-Gavaskar Trophy 2023: भारत विरद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येत आहे. दरम्यान, या सामन्यात पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारताची फलंदाजी चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता कोलमडली. पण याचदरम्यान, भारताचा कर्णधार पुजार आणि अक्षर पटेल यांच्यावर चिडताना दिसला.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (2 मार्च) ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला. पण भारताने प्रथम फलंदाजी करताना 109 धावाच पहिल्या डावात केलेल्या असल्याने ऑस्ट्रेलियाला 88 धावांची आघाडी मिळाली.

Rohit Sharma Angry
IND vs AUS, 3rd Test: तीन दिवसातच खेळ होणार खल्लास! भारताचा दुसरा डावही ढेपाळला, ऑस्ट्रेलियाची विजयाकडे वाटचाल

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावानंतर भारताचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन समोर भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. तरी एकबाजू चेतेश्वर पुजाराने सांभाळत अर्धशतक केले होते.

भारताचा हा डाव सुरु असताना 140 धावांवर 7 विकेट्स गमावल्यानंतर अक्षर पटेल पुजारासह फलंदाजीसाठी मैदानात उतरला. याचवेळी कॅमेरा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमकडे गेला. त्यावेळी रोहित ईशान किशनला बोलावून त्याच्याशी बोलताना दिसत होता. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

यादरम्यान, रोहित चिडून बोलत असल्याचे दिसून आले. जरी व्हायरल झालेल्या व्हिडिओत रोहितचा आवाज येत नसला तरी तो ईशानला पुजारा आणि अक्षरला आक्रमक खेळण्याचा संदेश घेऊन जाण्याबद्दल सांगत असल्याचे स्पष्ट दिसत होते.

तसेच व्हिडिओतून असे दिसते की पुजारा आणि अक्षर यांच्या बचावात्मक खेळावर रोहित नाराज होता आणि म्हणून तो त्यांना आक्रमक खेळण्यास सांगत होता. यावेळी त्याच्या तोंडून अपशब्द निघाल्याचा दावाही अनेक चाहत्यांनी केला आहे.

Rohit Sharma Angry
IND vs AUS: रेकॉर्डब्रेक अश्विन! कुंबळेनंतर कपिल देव यांचाही मोडला 'हा' मोठा विक्रम

या घटनेनंतर ईशानने पुजारा आणि अक्षरला संदेश दिला. विशेष म्हणजे त्यानंतर पुजाराने लायनच्या गोलंदाजीवर एक षटकारही ठोकला. हा षटकार पाहून रोहित खूप खूश झाल्याचे दिसले होते.

पण त्यानंतर काहीवेळातच लायननेच पुजाराला बाद केले. पुजाराने 142 चेंडूत 59 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर भारताची तळातली फलंदाजी फळीही झटपट बाद झाली. त्यामुळे भारताचा डाव 50.3 षटकात 163 धावांवर संपुष्टात आला. यासह दुसऱ्या दिवसाचा खेळही संपला. अक्षर पटेल 15 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, भारताला 88 धावांची पिछाडी स्विकारावी लागल्याने ऑस्ट्रेलियासमोर भारतीय संघाने अवघ्या 76 धावांचे आव्हान ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com