Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia 3rd ODI: टीम इंडियाला तिसरा सामना जिंकावाचं लागणार, नाहीतर...

IND vs AUS: अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

Manish Jadhav

India vs Australia 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs AUS) 22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. पण जर टीम इंडिया मालिकेतील शेवटचा सामना हरली तर टीमचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

टीम इंडियावर सर्वात मोठा धोका आहे

जर टीम इंडिया (Team India) तिसरा सामना हरली तर ती मालिका 1-2 ने गमावेल. त्याचबरोबर टीम इंडिया सध्या वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. पण तिसऱ्या वनडेत भारत हरला तर ऑस्ट्रेलिया त्याच्या पुढे जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 ने जिंकली तर दोन्ही संघांचे 113 गुण होतील. दुसरीकडे, टीम इंडियाने हा सामना जिंकला तर 115 गुणांसह एकदिवसीय क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर राहतील.

वनडे मालिका 1-1 अशी

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला (Australia) 35.4 षटकांत 188 धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 39.5 षटकांत पाच गडी गमावून 191 धावा केल्या. त्याचवेळी, दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा डाव 117 धावांवर आटोपला. टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका

17 मार्च रोजी भारताने पहिला एकदिवसीय सामना जिंकला.

ऑस्ट्रेलियाने दुसरी वनडे 19 मार्च रोजी जिंकली.

तिसरी वनडे 22 मार्च चेन्नई-

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ:

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन आगर, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा.

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी, 50 हजार रुपये दंडाची शिक्षा

Goa Tourism: जानेवारी, फेब्रुवारीत पर्यटक 'फुल्ल'! मार्चला 'युद्धा'चा फटका; गतवर्षीच्या तुलनेत पहिल्‍या तिमाहीत 32,500 पर्यटकांची वाढ

Mulgao Mining: मुळगावातील खाणीवरील पावसाळापूर्व काम रोखले, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचा ग्रामस्थांचा दावा

Goa Education: शैक्षणिक वर्षाचा 15 दिवसांतच 'फज्जा'! उकाडा, शिक्षकांच्‍या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठ

मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

SCROLL FOR NEXT