IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 'मिचेल' फॅक्टर भारतावर भारी! दुसऱ्या वनडेतील पराभवाची 3 कारणे

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाला विशाखापट्टणमला झालेल्या वनडेत 10 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.
India vs Australia, 2nd ODI
India vs Australia, 2nd ODIDainik Gomantak

India vs Australia 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला रविवारी (19 मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला तब्बल 10 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे 22 मार्चला चेन्नईत होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करताना भारताला 26 षटकात 117 धावांवर रोखले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकातच बिनबाद 121 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या पराभवाला कोणती कारणे जबाबदार होती, याचा आढावा घेऊ.

India vs Australia, 2nd ODI
IND vs AUS: गोलंदाजांनी रोखलं, सलामीवीरांनी ठोकलं! ऑस्ट्रेलिया भारतात 'असा' पराक्रम करणारा पहिलाच संघ

1. डावखुरी वेगवान गोलंदाजी भारताला भारी

दुसऱ्या वनडेत भारतीय फलंदाज मिचेल स्टार्क विरुद्ध चांगलेच संघर्ष करताना दिसले. स्टार्कने सामन्याच्या पहिल्या 9 षटकातच शुभमन गिल (0), रोहित शर्मा (13), सूर्यकुमार यादव(0) आणि केएल राहुल (9) या चार भारताच्या प्रमुख फलंदाजांना बाद केले होते. या सामन्यात त्याने एकूण 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, गेल्या काही काळापासून डावखुरी वेगवान गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसले आहे. पहिल्या वनडेत देखील स्टार्कने चांगली गोलंदाजी करताना 3 विकेट्स झटपट घेतल्या होत्या. स्टार्क देखील डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

India vs Australia, 2nd ODI
IND vs AUS 2nd ODI: टीम इंडियाचे शेर दुसऱ्या वनडेत ढेर! ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने जिंकली मॅच

2. वरची फळी झटपट कोसळली

या सामन्यात भारताच्या वरच्या फळीला खेळपट्टीवर तग धरून राहाता आले नाही. स्टार्कने निर्माण केलेल्या दबावात वरची फळी पूर्ण पणे कोलमडली. दुसऱ्या वनडेत भारताने 49 धावातच 5 विकेट्स गमावल्या होत्या.

पहिल्या वनडेत देखील 39 धावात 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यामुळे खालच्या फळीवर सातत्याने धावा करण्यासाठी दबाव येत आहे. हा दबाव दुसऱ्या वनडेत खालच्या फळीलाही पेलता आला नाही.

3. ऑस्ट्रेलियाची दमदार सलामी जोडी

दुसऱ्या वनडेत भारताला पॉवरप्लेमध्ये विकेट घेता आली नाही. ज्या खेळपट्टीवर भारतीय संघ 117 धावांवर कोसळला. त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी विकेट जाणार नाही, याची काळजी घेत आक्रमक फलंदाजी केली.

त्यांनी सुरुवातीलाच आक्रमण केल्याने भारतीय गोलंदाजांची लय बिघडली. ज्याचा फायदा मार्श आणि हेड यांना झाला. मार्शने सर्वाधिक 66 धावांची आणि हेडने 51 धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी 121 धावांची नाबाद भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com