Kuldeep Yadav Clean Bowled Alex Carey Dainik Gomantak
क्रीडा

Kuldeep Yadav Video: खतरनाक! कुलदीपच्या जादूई बॉलनं कॅरे क्लीन बोल्ड, चाहत्यांसह दिग्गजही थक्क

India vs Australia: चेन्नई वनडेत कुलदीप यादवने एक सुरेख चेंडू टाकत ऍलेक्स कॅरेला चीतपट केले. या चेंडूचे सध्या मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Pranali Kodre

Kuldeep Yadav Clean Bowled Alex Carey: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवत मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. असे असले तरी या सामन्यात कुलदीप यादवने ऍलेक्स कॅरेला बाद करताना टाकलेल्या चेंडूची चांगलीच चर्चा रंगली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशात ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन विकेट्स 85 धावांवर गमावल्या होत्या. या तिन्ही विकेट्स हार्दिक पंड्याने घेतल्या. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने पुढील विकेट्स गमावल्या. यामध्ये कुलदीप यादवच्या तीन विकेट्सचा समावेश होता.

कुलदीपने सर्वात आधी डेव्हिड वॉर्नर (23) आणि मार्नस लॅब्युशेनला (28) बाद केले. त्यांनंतर सामन्याच्या 39 व्या षटकात तो पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील टाकलेला पहिला चेंडू हवेत धीम्यागतीने गेला आणि जमीनीवर टप्पा पडल्यानंतर वळण घेत ऍलेक्स कॅरेच्या बॅटची बाहेरची कड घेत थेट ऑफ स्टंपवर आदळला.

त्याचा हा चेंडू पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करताना हा सुरेच चेंडू असल्याचे म्हटले. आजी-माजी दिग्गजांकडूनही कुलदीपचे कौतुक झाले. कॅरे या चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर काही काय आश्चर्यचकीत होऊन स्तब्ध थांबला होता. कुलदीपने कॅरेला पाचव्यांदा वनडेमध्ये बाद केले आहे. कॅरे 38 धावा करून बाद झाला.

कुलदीपने या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना 10 षटकात 56 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ 49 षटकात 269 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यांनतर 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली, तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्याने 40 धावांची खेळी केली.

याशिवाय शुभमन गिलने 37 आणि रोहित शर्माने 30 धावांची खेळी केली. पण असे असले तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाज आक्रमक खेळ करणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले. धावगतीवर नियंत्रण राखत विकेट्सही घेतल्याने ऑस्ट्रेलियाने भारताला 49.1 षटकात 248 धावांवर रोखण्यात यश मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant In Mumbai: "कामगारांचे कल्याण आणि सर्वांगीण विकासासाठी गोवा कटिबद्ध", 'OSH India 2025' मध्ये मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन

Goa Politics: "मंत्र्यांना सेवा नको, फक्त पैसा हवा...", मंत्री तवडकरांच्या नाराजीवरुन गिरीश चोडणकरांचा सरकारला टोला

Sam Konstas Century: कसोटी सामन्यात 'वनडे'चा तडका! बुमराहशी पंगा घेणाऱ्या पठ्ठ्यानं ठोकलं तूफानी शतक; भारतीय गोलंदाज हवालदिल

India vs Pakistan: लायकीवर उतरला पाकिस्तानी खेळाडू! सूर्यकुमार यादवला दिली शिवी; म्हणाला, "भारताला लाज वाटली पाहिजे" Watch Video

Goa Drug Case: मोडसाय - बड्डे येथे घरातूनच चालायचा 'ड्रग्स'चा धंदा; गांजासह पोलिसांनी जप्त केली Airgun

SCROLL FOR NEXT