IND vs AUS: फक्त सिरिजच नाही, नंबर वनचा ताजही गमावला, ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का

India vs Australia: टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर आयसीसी क्रमवारीतील पहिला क्रमांकही गमवावा लागला.
Australia
AustraliaDainik Gomantak

India vs Australia, 3rd ODI: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने बुधवारी (22 मार्च) भारताविरुद्ध चेन्नईला झालेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केले. इतकेत नाही, तर ऑस्ट्रेलियाने वनडे क्रमवारीतही भारताला धक्का दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने आता भारताला मागे टाकत आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. क्रमवारीत दोन्ही संघांच्या रेटिंग पाँइंट्समध्ये अगदी किरकोळ फरक आहे.

Australia
IND vs AUS: 6 वर्षांपासून टीम इंडिया चेन्नईमध्ये विजयाच्या प्रतिक्षेत!

या वनडे मालिकेत भारताने मुंबईत झालेला पहिला सामना 5 विकेट्सने जिंकला होता. त्यानंतर विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विजय मिळवला. यानंतर चेन्नईला झालेला तिसरा सामनाही ऑस्ट्रेलियाने जिंकला.

त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया 113.286 रेटिंग पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे. तसेच भारतीय संघ 112.638 रेटिंग पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दरम्यान, चेन्नईतील वनडे सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ 114 पाँइंट्ससह अव्वल क्रमांकावर होता आणि ऑस्ट्रेलिया 112 पाँइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर होता.

Australia
IND vs AUS ODI: टाटा, बायबाय, खतम... कांगारूंनी मारलं चेन्नईचं मैदान! भारताला पराभूत करत मालिकाही जिंकली

चेन्नई वनडेत ऑस्ट्रेलियाचा विजय

चेन्नईला झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 269 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच ऍलेक्स कॅरेने 38 आणि ट्रेविस हेडने 33 धावांची खेळी केली.

याशिवाय स्टीव्ह स्मिथचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या जवळपास सर्व खेळाडूंनी छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 269 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर २७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हार्दिक पंड्याने 40 धावा केल्या. याबरोबरच रोहित शर्माने 30 आणि शुभमन गिलने 33 धावांची खेळी केली. कोणीही मोठी खेळी करू शकले नाहीत. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी नियंत्रित गोलंदाजी करताना धावगतीवर रोख लावलेला होता. त्यामुळे भारताला 49.1 षटकात सर्वबाद 248 धावाच करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com