IND vs AUS ODI: टाटा, बायबाय, खतम... कांगारूंनी मारलं चेन्नईचं मैदान! भारताला पराभूत करत मालिकाही जिंकली

India vs Australia 3rd ODI: चेन्नईत झालेल्या निर्णायक वनडे सामन्यात भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकाही जिंकली आहे.
Australia
AustraliaDainik Gomantak

India vs Australia, 3rd ODI: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने चेन्नईत झालेल्या निर्णायक वनडे सामन्यात भारतीय संघाला 21 धावांनी पराभूत केले आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.1 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला.

Australia
IND vs AUS: 6 वर्षांपासून टीम इंडिया चेन्नईमध्ये विजयाच्या प्रतिक्षेत!

भारताकडून 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनी काही आक्रमक फटकेही सुरुवातीला खेळली. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण त्यांची 65 धावांची भागीदारी सीन ऍबॉटने रोहितला 30 धावांवर बाद करत तोडली. त्यानंतर गिललाही 37 धावांवर ऍडम झम्पाने बाद केले.

पण यानंतर विराट कोहलीने केएल राहुलला साथीला घेत भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली होती. त्यांनी एकमेकांना साथ देत अर्धशतकी भागीदारी करताना भारताला 140 धावांचा टप्पाही पार करून दिला होता. मात्र, झम्पाने केएल राहुलला चकवले. त्यामुळे तो 32 धावा करून सीन ऍबॉटकडे झेल देत बाद झाला.

त्यानंतर लगेचच स्टीव्ह स्मिथने केलेल्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे अक्षर पटेल 2 धावांवरच धावबाद झाला. पण नंतर विराटला साथ देण्यासाठी आलेल्या हार्दिकने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान विराटने अर्धशतकही पूर्ण केले.

पण तो अर्धशतकानंतर लगेचच एश्टन एगारविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात बाद झाला. विराटने 72 चेंडूत 54 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर एगारने सूर्यकुमार यादवलाही माघारी धाडले. त्यामुळे या मालिकेत सलग तिसऱ्यांदा सूर्यकुमार पहिलाच चेंडू खेळताना बाद झाला.

Australia
Team India: ठरलं तर! टी20 मालिकेसाठी ऑगस्टमध्ये भारतीय संघ करणार 'या' देशाचा दौरा

हार्दिक आणि रविंद्र जडेजा यांनी 7 व्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली होती. त्यांची जोडी मैदानात असेपर्यंत भारतीय संघाच्या विजयाच्या आशा प्रबळ होत्या. पण ४० धावांवर खेळणाऱ्या हार्दिकला झम्पाने स्टीव्ह स्मिथच्या हातून झेलबाद केले.

त्यापाठोपाठ काही वेळातच जडेजालाही झम्पानेच 18 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर तळातील फलंदाजांना फार काही करता आले नाही आणि भारताचा डाव 49.1 षटकातच संपुष्टात आला.

दरम्यान, संपूर्ण डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकूश ठेवताना धावगती नियंत्रणात ठेवली होती. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय फलंदाजांवर मोठे फटके मारण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी झाला.

ऑस्ट्रेलियन संघाकडून झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. एगारने 2 विकेट्स घेतल्या. तसेच मार्कस स्टॉयनिस आणि सीन ऍबॉटने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Australia
IPL New Rule: काय सांगता! टॉसनंतर कॅप्टन घोषित करणार प्लेइंग-11, नक्की काय आहेत नियम?

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने अर्धशतकी भागीदारी करताना चांगली सुरुवात केली होती. पण हार्दिक पंड्याने भारताला ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याने आधी हेडला 33 धावांवर बाद केले. त्यानंतर त्याने स्टीव्ह स्मिथलाही शुन्यावरच माघारी धाडले. स्मिथनंतर हार्दिकने मार्शला 47 धावांवर बाद करत मोठा अडथळाही दूर केला.

यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नियमित अंतराने बाद केले. पण ऑस्ट्रेलियन संघाकडून प्रत्येक फलंदाजांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिल्याने ऑस्ट्रेलिया संघ 49 षटकात सर्वबाद 269 धावा करू शकला.

भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com