Virat Kohli Dance Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'नाटू नाटू' नंतर आता 'लुंगी डान्स'वर थिरकला किंग कोहली, Video व्हायरल

Video Viral: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या वनडे सामन्यादरम्यान विराट कोहली 'लुंगी डान्स'वर डान्स करताना दिसला.

Pranali Kodre

Virat Kohli Dance on Lungi Dance: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यादरम्यान विराट कोहली मस्तीच्या मुडमध्ये दिसला होता. तो मैदानात डान्स करतानाही दिसला. त्याचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी उतरला. ज्यावेळी भारतीय संघ मैदानात जाणार होता, त्यावेळी स्टेडियममध्ये लुंगी डान्स हे गाणे वाजायला लागले. त्यावर बाऊंड्री लाईनजवळ उभा असलेला विराट कोहलीने लगेचच ठेका धरला. तो काही डान्सच्या स्टेप्सही करताना दिसला.

यावेळी त्याच्या आजूबाजूला भारतीय संघातील अन्य काही खेळाडूही होते. यात रविंद्र जडेजाही होता. विराटला पाहून जडेजाही काही डान्स स्टेप्स करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

विराट यापूर्वीही मैदानात थिरकताना दिसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईत झालेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान देखील विराट नाटू-नाटू या गाण्यावर थिरकताना दिसला होता. नाटू नाटू या गाण्याला यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे.

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

चेन्नईत झालेल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 21 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने मालिकाही 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 269 धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच ऍलेक्स कॅरेने 38 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 54 धावांची खेळी केली. तसेच हार्दिक पंड्याने 40 धावांची खेळी केली. याशिवाय रोहित शर्माने 30, शुभमन गिलने 37 आणि केएल राहुलने 32 धावांची खेळी केली होती. पण कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

तसेच ऑस्ट्रेलियाने केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे भारताला या सामन्यात 49.1 षटकात सर्वबाद 248 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: गोकुळाष्टमीच्या निमित्त जय श्रीराम अखिल विश्व गोसंवर्धन केंद्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून गोमातेची पूजा

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT