Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd Test: श्रेयस अय्यरच्या कमबॅकसह टीम इंडियात मोठे बदल? अशी असेल Playing XI

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असेलल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

दिल्लीच होणाऱ्या या सामन्यात भारताच्या मधल्या फळीत श्रेयस अय्यरचे पुनरागमन होऊ शकते. गेल्या महिन्याभरापासून श्रेयस पाठीच्या दुखापतीचा सामना करत होता. त्यामुळे त्याला नागपूरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते.

पण आता तो दिल्ली कसोटीपूर्वी तंदुरुस्त असल्याचे बीसीसीआयच्या मेडिकल स्टाफकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तो भारतीय संघात सामीलही झाला आहे. दरम्यान, तो आता भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, श्रेयस संघात आल्याने सूर्यकुमार यादवला आपली जागा गमवावी लागू शकते. सूर्यकुमारने पहिल्या कसोटीतून पदार्पण केले होते. पण आता त्याला पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागू शकते.

याशिवाय सलीमीच्या पर्यायासाठी रोहित शर्माबरोबर केएल राहुल की शुभमन गिल यांच्यातील कोणाला संधी द्यायची हा प्रश्न संघव्यवस्थपनासमोर उभा आहे. तरी सध्या फॉर्मशी झगडत असलेल्या केएल राहुलला आणखी एक संधी दिली जाण्याची शक्यता दाट आहे. पण जर राहुलला संधी मिळाली नाही, तर गेल्या महिन्यापासून तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा शुभमन गिलला संधी मिळू शकते.

त्याचबरोबर मधल्या फळीत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा कायम असतील. पुजाराचा हा 100 वा कसोटी सामना असल्याने त्याच्यासाठी खास असणार आहे. तसेच यष्टीरक्षक म्हणून केएस भरतवर विश्वास कायम ठेवून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम केले जाऊ शकते.

तसेच गोलंदाजी फळीत बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे. रविंद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच तळातली फलंदाजीही सांभाळू शकतात. ते अष्टपैलू म्हणून भूमिका निभावतील.

त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावरच कायम राहण्याची शक्यता आहे.

दिल्ली कसोटीसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

SCROLL FOR NEXT