Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: अरेरे! 100 व्या कसोटीतच पुजारा शून्यावर आऊट, हा नकोसा रेकॉर्डही नावावर

चेतेश्वर पुजारा त्याच्या 100 व्या कसोटीत शुन्यावर बाद झाला आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी खास आहे. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. मात्र, याच सामन्यात त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.

पुजारा या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात शुन्यावरच बाद झाला. केएल राहुल 17 धावांवर बाद झाल्यानंतर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. पण 20 व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने भारताला दुहेरी धक्के दिले.

त्याने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्माला 32 धावांवर त्रिफळाचीत केले, तर चौथ्या चेंडूवर पुजाराला पायचीत पकडले. पुजारा 7 चेंडूत शुन्य धावेवर बाद झाला. त्यामुळे तो कारकिर्दीतील 100 व्या कसोटीत शुन्यावर बाद होणारा जगातील 8 वा खेळाडू आहे.

यापूर्वी असा नकोसा विक्रम दिलीप वेंगसरकर, ऍलेन बॉर्डर, कर्टनी वॉल्श, मार्क टेलर, स्टीफन फ्लेमिंग, ऍलिस्टर कूक आणि ब्रेंडन मॅक्यूलम यांनी केला आहे. हे सातही खेळाडू त्यांच्या १०० व्या कसोटीत किमान एका डावात शुन्यावर बाद झाले आहेत.

नॅथन लायनचे भारताला धक्के

दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेरपर्यंत भारताने 4 विकेट्स गमावत 88 धावा केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे नॅथन लायननेच भारताच्या पहिल्या चारही विकेट्स घेतल्या आहेत.

पुजारा 100 कसोटी खेळणारा 13 वा भारतीय

चेतेश्वर पुजारा 100 कसोटी सामने खेळणारा भारताला एकूण १३ वा खेळाडू आहे. यापूर्वी भारताकडून सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (106), इशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103), विरेंद्र सेहवाग (103) या खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT