IND vs AUS: सन्मान तर होणारच! पुजारासाठी टीम इंडियाकडून 'स्पेशल गार्ड ऑफ ऑनर', पाहा Video

Video: कारकिर्दीतील 100 वी कसोटी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला भारतीय संघातील खेळाडूंकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara Dainik Gomantak

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील दुसरा कसोची सामना शुक्रवारपासून (17 मार्च) सुरू होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत असून हा सामना भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यासाठी खास आहे.

हा सामना पुजाराचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे त्याचा या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी मोठा सन्मान करण्यात आला. दरम्यान, या सामन्यासाठी मैदानात उतरताना भारतीय संघाने पुजाराला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

Cheteshwar Pujara
IND vs AUS: 'हे सोपं नव्हे!', टीम इंडियाकडून 100 व्या कसोटीच्या पुजाराला स्पेशल शुभेच्छा, पाहा Video

त्याला भारतीय संघ गार्ड ऑफ ऑनर देत असतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की सामन्यासाठी मैदानात उतरत असताना भारतीय संघातील खेळाडू दोन्ही बाजूंनी उभे होते. तसेच त्यांच्यामधून चेतेश्वर पुजारा चालत मैदानात आला. यावेळी पुजारा काहीसा भावूकही दिसला.

तसेच गार्ड ऑफ ऑनरनंतर सर्व भारतीय खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वजण एकत्र गोलाकार उभे राहिले. यावेळी पुजाराने त्यांच्याशी संवादही साधला. या व्हिडिओला युजर्सकडून मोठा प्रतिसाद मिळत असून पुजाराचे अभिनंदनही केले जात आहे.

Cheteshwar Pujara
IND vs AUS: श्रेयसचं कमबॅक, तर सुर्या आऊट! दुसऱ्या कसोटीसाठी पाहा दोन्ही संघांची Playing XI

पुजाराला गावसकरांच्या हस्ते मिळाली स्पेशल कॅप

पुजाराला त्याच्या 100 व्या कसोटीनिमित्ताने खास कॅप दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी त्यांनी पुजाराचे कौतुक केले, तसेच त्यांनी त्याचे १०० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याचे स्वागत करताना अभिनंदन केले. याशिवाय गावसकरांनी त्याने या सामन्यात शतक करावे अशी आशाही व्यक्त केली.

यावेळी पुजाराने गावसकरांचे आभार मानले. त्याने याबरोबकच बीसीसीआय, संघसहकारी, सोपोर्ट स्टाफ, चाहते आणि कुटुंबियांचेही आभार मानले. या सोहळ्यादरम्यान पुजाराचे वडील, पत्नी आणि मुलगी देखील मैदानावर उपस्थित होती.

पुजारा 100 कसोटी खेळणारा 13 वा खेळाडू

भारताकडून 100 कसोटी सामना खेळणारा पुजारा 13 वा खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावसकर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), विराट कोहली (105), इशांत शर्मा (105), हरभजन सिंग (103), विरेंद्र सेहवाग (103) या भारतीय खेळाडूंनी 100 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com