Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI: कॅप्टन रोहितचं झालं कमबॅक! दोन्ही संघात मोठे बदल, पाहा Playing XI

Pranali Kodre

India vs Australia 2nd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रविवारी (१९ मार्च) वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. विशाखापट्टणला होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून रोहित शर्माने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पुनरागमन केले आहे. तो पहिल्या सामन्यासाठी कौटुंबिक कारणात्सव अनुपस्थित होता. रोहितचे पुनरागमन झाल्याने ईशान किशनला दुसऱ्या सामन्यासाठीच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावे लागले आहे.

याशिवाय गोलंदाजी फळीत देखील बदल झाला असून शार्दुल ठाकूरला वगळण्यात आले असून त्याच्याऐवजी अक्षर पटेलला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघातही दोन बदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्लेन मॅक्सवेलऐवजी नॅथन एलिसला संधी देण्यात आली आहे. मॅक्सवेलला दुखापत झाली आहे. तसेच ऍलेक्स कॅरेचे या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे जोश इंग्लिसला बाहेर जावे लागले आहे.

दरम्यान, दुसरा वनडे सामना जिंकून भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने मुंबईला झालेल्या पहिला वनडे सामना जिंकला आहे. त्यामुळे भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. तसेच ऑस्ट्रेलिया संघ देखील दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याबरोबरच आव्हान राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलिया संघ - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्युशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: मिरामार येथे अंगावर वीज पडून केरळच्या एकाचा मृत्यू

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

France Violence: फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका! न्यू कॅलेडोनियात आणीबाणी लागू; 4 जणांचा मृत्यू, 5,000 दंगलखोरांवर कारवाई

Bicholim News : धावत्या दुचाकीवर कोसळली फांदी; वाहतूक खोळंबली

SCROLL FOR NEXT