Mohammed Shami: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूरमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात 10 व्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद शमीने एक मोठा कारनामा केला आहे.
या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात रविंद्र जडेजा 70 धावांवर बाद झाल्यानंतर शमी फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने काही आक्रमक फटके खेळत अक्षर पटेलबरोबर अर्धशतकी भागीदारी केली.
या भागीदारीदरम्यान मोहम्मद शमीने 47 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार खेचत 37 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने कसोटी कारकिर्दीत २५ षटकार पूर्ण केले आहेत. शमीने आत्तापर्यंत 61 कसोटी सामने खेळले असून 85 डावात फलंदाजी करताना हे 25 षटकार मारले आहेत.
शमी कसोटीत 25 षटकारांचा टप्पा पार करणारा भारताचा 16 वा खेळाडू आहे. विषेश म्हणजे कसोटीत भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमी विराट कोहली (24 षटकार), युवराज सिंग (22 षटकार), राहुल द्रविड (21 षटकार), केएल राहुल (17 षटकार), चेतेश्वर पुजारा (15 षटकार), व्हीव्हीएस लक्ष्मणन(5 षटकार) यांच्याही पुढे आहे.
नागपूर कसोटीत शमीने आक्रमक फलंदाजी करताना अक्षर पटेलबरोबर 9 व्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. तसेच अक्षरने 84 धावांची खेळी केली.
त्याच्यापूर्वी भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची शतकी खेळी केली. तसेच रविंद्र जडेजाने ही अर्धशतक केले. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलियाच्या टॉड मर्फीने 7 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवरच सर्वबाद झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅब्युशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या होत्या. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
कसोटीत 25 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू -
90 - विरेंद्र सेहवाग
78 - एमएस धोनी
69 - सचिन तेंडुलकर
66 - रोहित शर्मा
61 - कपिल देव
57 - सौरव गांगुली
55 - रविंद्र जडेजा
55 - ऋषभ पंत
42 - हरभजन सिंग
38 - नवज्योत सिंग सिद्धू
34 - अजिंक्य रहाणे
33 - मुरली विजय
28 - मयंक अगरवाल
28 - झहिर खान
26 - सुनील गावसकर
25 - मोहम्मद शमी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.