Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS 1st ODI: जड्डू, गिल, केएलचे शानदार कॅच, तर शमी, सिराज गोलंदाजीत चमकले; पाहा Video

पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांचेही योगदान महत्त्वाचे राहिले.

Pranali Kodre

India vs Australia 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर वनडे मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाकडून पहिल्या डावात चांगली सांघिक कामगिरी पाहायला मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 35.4 षटकातच 188 धावांवर रोखले. यामध्ये भारतीय गोलंदाजांबरोबरच भारतीय क्षेत्ररक्षकांनीही शानदार कामगिरी केली.

मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाच्या लयीत असणारा फलंदाज ट्रेविस हेडला 5 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर मिशेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सांभाळला. मात्र स्मिथला हार्दिक पंड्याने 13 व्या षटकात माघारी धाडले. त्याचा सुरेख झेल यष्टीरक्षक केएल राहुलला डाईव्ह मारत पकडला.

दरम्यान, मार्शने त्याचा चांगला खेळ कायम करताना चौकार-षटकारांची बरसात करत अर्धशतक पूर्ण केले. त्याला मार्नस लॅब्युशेन चांगली साथ देत होता. पण अखेर जडेजाने त्यांची जोडी तोडली. 20 व्या षटकात 10 चौकार आणि 5 षटकारांसह 65 चेंडूत 81 धावांवर खेळत असलेल्या मार्शला त्याने सिराजच्या हातून झेलबाद केले.

त्यानंतर कुलदीपच्या चेंडूवर जडेजाने हवेत सूर मारत खाली राहिलेला चेंडूत अप्रतिमरित्या झेलत लॅब्युशेनचा अडथळा दूर केला. लॅब्युशेन 15 धावांवर माघारी परतला. यानंतर मोहम्मद शमीने त्याच्या लागोपाठच्या षटकात जोश इंग्लिस आणि कॅमेरॉन ग्रीनला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला मोठे धक्के दिले.

शमीने 32 व्या षटकात आक्रमक मार्कस स्टॉयनिसलाही बाद केले. स्टॉयनिसला शानदार झेल शुभमन गिलने स्लीपमध्ये घेतला. गिलने सिराजच्या गोलंदाजीवर 34 व्या षटकात सीन ऍबॉटचाही सुंदर झेल घेतला.

त्यापूर्वी जडेजाने ग्लेन मॅक्सवेलचा अडथळा दूर करत ऑस्ट्रेलियन संघाला दबावात टाकले. अखेर 36 व्या षटकात ऍडम झम्पाला केएल राहुलकरवी झेलबाद करत सिराजने ऑस्ट्रेलियन संघाचा डाव संपवला.

दरम्यान, या डावात भारताकडून शमी आणि सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच जडेजाने 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाने गमावलेल्या 10 विकेट्सपैकी तब्बल 7 विकेट्स झेलांच्या रुपात गेल्या. यष्टीरक्षक केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी 2 झेल घेतल्या, तर सिराज, जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 झेल घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT