IND vs AUS: ...म्हणून रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळला नाही

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात झाली असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला.

India vs Australia 1st ODI | Dainik Gomantak

या सामन्यात भारतचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित होता.

Rohit Sharma | Dainik Gomantak

रोहित कौटुंबिक कारणामुळे पहिल्या वनडेत खेळणार नसल्याचे बीसीसीआयने फेब्रुवारीमध्येच मालिकेसाठी संघ जाहीर करताना स्पष्ट केले होते.

Rohit Sharma | Dainik Gomantak

आता मीडियातील रिपोर्ट्सनुसार असे समजले आहे की रोहितने त्याच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. त्याचमुळे तो या सामन्यात खेळला नाही.

Rohit Sharma | Dainik Gomantak

त्याच्याऐवजी हार्दिक पंड्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले.

Hardik Pandya | Steve Smith | Dainik Gomantak

तसेच रोहितच्या जागेवर शुभमन गिलबरोबर ईशान किशन याने सलामीला फलंदाजी केली.

Ishan Kishan | Dainik Gomantak

दरम्यान रोहित दुसऱ्या वनडेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

Rohit Sharma | Dainik Gomantak

त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत भारताचे नेतृत्व करताना दिसेल.

Rohit Sharma | Dainik Gomantak
Rahul Chahar Wife | Dainik Gomantak