India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Pitch and Weather Update:
रविवारी (14 जानेवारी) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. इंदूरला होणाऱ्या या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे.
दरम्यान, मोहालीला जेव्हा पहिला सामना झाला होता, तेव्हा तेथील वातावरण अत्यंत थंड होते. त्यामुळे खेळाडूंना हँड वॉर्मरही वापरावे लागले होते. त्यामुळे आता इंदूरचे वातावरण कसे असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
रविवारी इंदूरमध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच दिवसा 30 डिग्री सेल्सियसदरम्यान तापमान असू शकते. तसेच रात्री सामन्याच्या दरम्यान साधारण 10 डिग्री सेल्सियसपर्यंत हे तापमान उतरू शकते. त्यामुळे मोहालीपेक्षा इंदूरचे वातावरण उबदार असेल.
इंदूरची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान देखील फलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता दाट आहे. तसेच वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूने मदत मिळू शकते, त्याचबरोबर मधल्या षटकात फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते.
इंदूरला आत्तापर्यंत तीन आंतरराष्ट्रीय टी20 सामने झाले आहेत. यातील दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या मैदानावर झालेल्या अखेरच्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 227 धावा उभारल्या होत्या.
सध्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला असल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी भारताकडे असणार आहे. तसेच अफगाणिस्तानही दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करतील.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान- इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.