IND vs ENG: मोहम्मद शमी अन् प्रसिध कृष्णाला का मिळाली नाही टीम इंडियात संधी? कारण आले समोर

India Cricket team: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश नाही.
Mohammad Shami - Prasidh Krishna
Mohammad Shami - Prasidh KrishnaX/BCCI
Published on
Updated on

India Squad for first Two Test against England:

इंग्लंडचा क्रिकेट संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारताविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली.

पहिल्या दोन कसोटीसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कृष्णाने काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण केले होते.

Mohammad Shami - Prasidh Krishna
IND vs AFG: 'ग्लव्ह्ज घालून बॉलिंग करू का?', अक्षर पटेलचा अंपायरला अनोखा सवाल

दरम्यान, मीडियातील अनेक रिपोर्ट्सनुसार शमी अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. वनडे वर्ल्डकप 2023 नंतर शमी स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही, तो सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचमुळे त्याला खेळवण्याची घाई बीसीसीआयने केलेली नाही.

याशिवाय प्रसिध कृष्णा शुक्रवारी कर्नाटककडून गुजरातविरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळत असताना दुखापतग्रस्त झाला. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याला मांडीची दुखापत झाली आहे. त्याने 14.5 षटके गोलंदाजी केली.

मात्र, त्यानंतर त्याला गोलंदाजी करता आली नाही. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला 4 ते 6 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे त्यालाही इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यासाठी संधी देण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे.

Mohammad Shami - Prasidh Krishna
IND vs AFG: 'पोहे आणि आवेश खान', दुसऱ्या T20I साठी इंदूरला पोहचताना टीम इंडियाला काय आठवलं, पाहा Video

तथापि, ईशान किशनलाही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. मात्र, यामागील ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले होते की ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून तो निवडीसाठी उपलब्ध असल्याचे दाखवावे.

ईशानऐवजी भारतीय संघात ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या कसोटी संघात सध्या जुरेलसह केएल राहुल आणि केएल भरत हे दोघेही यष्टीरक्षक म्हणून पर्याय आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ -

  • रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com