IND vs AFG: विराट, जयस्वालचे पुनरागमन होणार, मग कोणाला मिळणार डच्चू? दुसऱ्या T20I साठी संभावित 'प्लेइंग-11'

Virat Kohli: भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात दुसरा टी20 सामना रविवारी होणार असून या सामन्यात विराट कोहलीचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.
Virat Kohli - Rohit Sharma
Virat Kohli - Rohit SharmaX/BCCI

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore, Probable Playing XI:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू असून दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार असून संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरु होईल.

दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली खेळला नव्हता. त्याने वैयक्तिक कारणाने विश्रांती घेतली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता रोहितनंतर विराटचेही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पुनरागमन होताना दिसणार आहे.

विराटने यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये भारताकडून अखेरचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर आता तो पहिल्यांदाच टी20मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतो.

Virat Kohli - Rohit Sharma
IND vs AFG: ''माही भाईकडून जे शिकलो तेच केले...''; पहिल्या T20 नंतर शिवम दुबेने केला मोठा खुलासा

तथापि, जर विराटला अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर कोणाला संघातून वगळायचं हा मोठा प्रश्न संघव्यवस्थापनेसमोर असणार आहे.

दरम्यान, विराटला जर संधी दिली, तर तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर रहावे लागू शकते. याबरोबर पहिल्या सामन्यात मांडीच्या वेदनेमुळे यशस्वी जयस्वाल खेळू शकला नव्हता. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याचेही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन होऊ शकते. त्याला शुभमन गिलच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते.

याशिवाय मोठे बदल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होण्याची शक्यता कमी आहे. सलामीला कर्णधार रोहितसह जयस्वाल खेळताना दिसू शकतो. तसेच मधल्या फळीत विराटसह शिवम दुबे आणि रिंकू सिंग असू शकतो.

Virat Kohli - Rohit Sharma
IND vs AFG: 'पोहे आणि आवेश खान', दुसऱ्या T20I साठी इंदूरला पोहचताना टीम इंडियाला काय आठवलं, पाहा Video

याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्मालाच पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. फिरकी गोलंदाजीसाठी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्वोई यांनाच कायम केले जाऊ शकते.

अक्षर आणि सुंदर खालच्या फळीत अष्टपैलू खेळाडू म्हणून फलंदाजीतही भरीव योगदान देऊ शकतात. वेगवान गोलंदाजीसाठी अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारवरच अधिक विश्वास दाखवला जाऊ शकतो.

भारताला मालिका विजयाची संधी

मोहालीला झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाने या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे.

त्याचमुळे जर भारतीय संघाने दुसरा सामनाही जिंकला, तर ते मालिकाही खिशात घालतील. पण जर दुसरा सामना अफगाणिस्तानने जिंकला, तर मालिकेत बरोबरी होईल आणि तिसरा टी20 सामना निर्णायक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com