Team India AFP
क्रीडा

IND vs AFG: रोहितचं पुनरागमन, तर विराट अनुपलब्ध, पहिल्या T20I साठी कशी असेल भारताची 'प्लेइंग-11'?

India vs Afghanistan: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यासाठी कशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन?

Pranali Kodre

India vs Afghanistan, 1st T20I Match at Mohali, probable Playing XI:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारपासून (11 जानेवारी) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीला होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे.

या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि रोहित शर्मा यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. असे असले तरी पहिल्या सामन्यासाठी विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे उपलब्ध नसल्याचे प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे. तसेच द्रविडने असेही सांगितले आहे की सलामीला रोहित आणि यशस्वी जयस्वालची जोडी उतरेल.

त्यामुळे आता पहिल्या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला असेल. त्याचाच घेतलेला हा आढावा.

द्रविडने म्हटल्याप्रमाणे रोहितसह जयस्वाल सलामील फलंदाजी करताना दिसू शकतो. तसेच विराटच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो.

त्याचबरोबर मधल्या फळीत तिलक वर्मा आणि रिंकू सिंग फलंदाजी फळीत असू शकतात. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसनला जितेश शर्माच्या आधी पहिली पसंती मिळू शकते. अक्षर पटेल अष्टपैलू म्हणून खेळू शकतो. तो फिरकी गोलंदाजीतही योगदान देईल. त्याला कुलदीप यादवची साथ मिळू शकते.

तसेच अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळताना दिसू शकतात. दरम्यान तिलकही पार्टटाईम फिरकी गोलंदाज म्हणून योगदान देऊ शकतो.

आमने-सामने कामगिरी

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारत आणि अफगाणिस्तान संघात होणारी ही पहिलीच द्विपक्षीय टी20 मालिका आहे. यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान संघात द्विपक्षीय टी20 मालिका झालेली नाही.

भारत आणि अफगाणिस्तान वेगवेगळ्या स्पर्धेत आत्तापर्यंत 5 टी20 सामने खेळले आहेत. यातील 4 सामने भारताने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

पहिल्या टी20 साठी असा असू शकतो भारताता संभावित प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT