IND vs AFG: अफगाणिस्तानला मोठा झटका, भारताविरुद्धच्या T20 मालिकेला राशिद खान मुकणार

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (11 जानेवारी) होणार आहे.
Rashid Khan
Rashid Khan Dainik Gomantak

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (11 जानेवारी) होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच T20 फॉरमॅटमधील द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टी-20 सामने खेळले गेले आहेत. आगामी T20 विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची दोन्ही संघांना चांगली संधी आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची मालिका आहे. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार आहेत.

दरम्यान, मोहालीत होणाऱ्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तान संघाला मोठा झटका बसला आहे. स्टार फिरकीपटू राशिद खान मालिकेतून बाहेर गेला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तो अद्याप सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तयार नाही. कर्णधार इब्राहिम झाद्रानने राशिदच्या वगळण्याला दुजोरा दिला. सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेत त्याने सांगितले की, आपल्या संघाला राशिदची उणीव भासेल.

Rashid Khan
IND vs AFG, T20I: विराट-रोहितचे पुनरागमन, पण जडेजा-बुमराहला का मिळाली नाही टीम इंडियात संधी? कारण आले समोर

राशिदशिवाय आम्ही संघर्ष करु: इब्राहिम झाद्रान

इब्राहिम झाद्रान पत्रकार परिषदेत म्हणाला की, "राशिद पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आम्हाला मालिकेत त्याची उणीव भासेल. आम्ही राशिदशिवाय संघर्ष करु, आम्ही टीम इंडियाचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत." राशिद शेवटचा अफगाणिस्तानकडून 10 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. राशिदने पाच कसोटी सामन्यांमध्ये 34 बळी घेतले आहेत. 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये 183 बळी घेतले आहेत. तर राशिदने 81 टी-20 सामन्यात 130 बळी घेतले आहेत.

Rashid Khan
IND vs AFG: रोहित पुन्हा भारताचा T20 कर्णधार, विराटचेही कमबॅक; अफगाणिस्ताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

T20 मालिकेसाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान: इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीप), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला उमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com