Shafali Verma Dainik Gomantak
क्रीडा

U19 Women's T20 WC 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, शफाली वर्माकडे कर्णधारपद

जानेवारी 2023 मध्ये 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळवला जाणार असून, त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

जानेवारी 2023 मध्ये पहिल्यांदाच 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्डकपसाठी बीसीसीआयच्या महिला निवड समीतीने 15 जणींच्या संघाची घोषणा केली आहे. याबरोबरच डिसेंबर 2022 आणि जानेवारी 2023 दरम्यान 19 वर्षांखालील महिला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड झाली आहे.

वर्ल्डकप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताच्या युवा संघाचे नेतृत्व शफाली वर्माकडे (Shafali Verma) सोपवण्यात आले आहे. श्वेता सेहरावत ही उपकर्णधार असेल. याबरोबरच रिचा घोषकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असणार आहे. शफालीकडे या स्पर्धांमध्ये सर्वांचेच लक्ष असेल. कारण आता तिला बऱ्यापैकी वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.

दरम्यान, 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकप देखील दक्षिण आफ्रिकेतच 14 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून भारताचा (Team India) डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये यजमान दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.

प्रत्येक ग्रुपमधील अव्वल 3 संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. या फेरीत 12 संघांची दोन गटात विभागणी होईल. नंतर पुढे या दोन ग्रुपमधून अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुद्धची टी20 मालिका 27 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 29 डिसेंबरला, तिसरा सामना 31 डिसेंबरला खेळवला जाईल. चौथा आणि पाचवा सामना नवीन वर्षात अनुक्रमे 2 आणि 4 जानेवारी 2023 रोजी खेळवला जाईल. हे सर्व सामने टक्स ओव्हल, प्रीटोरिया येथे खेळवण्यात येणार आहे.

19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ - शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हृषिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाज, शबनम एमडी.

राखीव खेळाडू: शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी 19 वर्षांखालील महिला भारतीय संघ - शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हृषिता बसू (यष्टीरक्षक), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, तीतस साधू, फलक नाज, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT