Goa Sports: 19 वर्षांखालील पुरुष, महिला एक दिवसीय क्रिकेट संघाची निवड

कौशल हट्टंगडी पुरुष, तर इब्तिसाम शेख महिला संघाचे नेतृत्व करेल.
गोव्याच्या 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर
गोव्याच्या 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकरDainik Gomantak

पणजी: गोव्याच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धा क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. कौशल हट्टंगडी पुरुष, तर इब्तिसाम शेख महिला संघाचे नेतृत्व करेल. विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा एलिट क गटात समावेश आहे. या गटातील सामने 28 सप्टेंबरपासून अहमदाबाद येथे खेळले जातील. संघाची विलगीकरण प्रक्रिया स्पर्धास्थळी सोमवारपासून (ता. 20) सुरू होईल. एलिट क गटात मुंबई, हैदराबाद, राजस्थान, त्रिपुरा व आसाम हे संघ गोव्याचे प्रतिस्पर्धी आहेत.

गोव्याच्या 19 वर्षांखालील  महिला क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर
गोव्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकरDainik Gomantak

महिलांच्या 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोवा एलिट ब गटात खेळणार असून सामने नागपूर येथे 28 सप्टेंबरपासून खेळले जातील. त्यानिमित्त स्पर्धा केंद्रावर सर्व संघांचे सोमवारपासून विलगीकरण होईल. गोव्याच्या एलिट ब गटात दिल्ली, बंगाल, पुदुचेरी, झारखंड व तमिळनाडू हे संघ आहेत.गोव्याचे दोन्ही संघ सध्या पुण्यात सराव करत असून तेथून थेट स्पर्धा केंद्रावर विलगीकरणासाठी रवाना होतील. स्पर्धा कोविड-19 मार्गदर्शन शिष्टाचारानुसार खेळली जाईल.

गोव्याच्या 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट संघासमवेत गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज लोटलीकर
Goa: मी मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी केलेली नाही; श्रीपाद नाईक

गोव्याचे 19 वर्षांखालील क्रिकेट संघ

पुरुष: कौशल हट्टंगडी (कर्णधार), आयुष वेर्लेकर, शिवेंद्र भुजबळ (यष्टिरक्षक), दीप कसवणकर, लक्मेश पावणे, फरदीन खान, आर्यन नार्वेकर, प्रज्ञेश गावकर, मनीष काकोडे, सनथ नेवगी, सुजय नाईक, इझान शेख, उदित यादव, शुभम गजिनकर, राजन सरोज, युवराज सिंग, फैझान सय्यद, साईनाथ पेडणेकर, रिजूल पाठक, नामदेव राऊळ.

महिला: इब्तिसाम शेख (कर्णधार), मेताली गौंडर, पलक आरोंदेकर, प्रेषा नाईक, रिया ढोबळे, रिया नाईक, रोशनी परब मयेकर (यष्टिरक्षक), सावली कोळंबकर, सेजल नाईक, सेजल शेट्टी, शिवानी नाईक, तनया नाईक, तानिया पवार, ऊर्वशी गोवेकर, एनालिझ गोम्स, मृण्मयी भिके, शिखा चोडणकर, शेरॉन झेवियर, अस्मी पालव, सिद्धी सवासे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com