Arshin Kulkarni - Jacques Kallis Instagram
क्रीडा

Arshin Kulkarni: समोर कॅलिसला पाहाताच अर्शिनने केला वाकून नमस्कार; भारताचा U19 स्टार म्हणाला, 'आयुष्यातील बेस्ट दिवस'

U19 India Team: '... तेव्हा तुला भेटू शकेल म्हणून आई-बाबांना द. आफ्रिका सांगायचो', कॅलिसला भेटून भारताचा U19 क्रिकेटपटू अर्शिन कुलकर्णी भारावला.

Pranali Kodre

India U-19 Cricketer Arshin Kulkarni meet Jacques Kallis Ahead Of U19 World Cup 2024

भारताचा 19 वर्षांखालील संघ दक्षिण आफ्रिकेत आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 19 जानेवारीपासून 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अष्टपैलू अर्शिन कुलकर्णीचाही समावेश आहे.

18 वर्षी अर्शिन हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिसचा मोठा चाहता असून त्याला लहानपणापासून आदर्श मानत आला आहे. दरम्यान, मंगळवारी अर्शिनला त्याचा आदर्श असलेल्या कॅलिसला भेटण्याची संधी मिळाली. त्याच्यासाठी हा स्पप्नपूर्तीचा क्षण होता. याबद्दल त्याने सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे.

दरम्यान, जेव्हा कॅलिसला अर्शिन भेटला, तेव्हा त्याने त्याला वाकून नमस्कारही केला. याशिवाय अर्शिनला कॅलिसबरोबर चर्चा करण्याची संधीही मिळाली. तसेच अर्शिनने त्याला एक पत्र देखील दाखवले, ज्यावर कॅलिसने काहीवर्षांपूर्वी स्वाक्षरी करत त्याला पाठवले होते. अर्शिनने कॅलिसला पाया पडण्यापूर्वी विचारले देखील. कॅलिसने अर्शिनला जर्सीवर स्वाक्षरी करूनही दिली.

अर्शिनने या खास भेटीबद्दल पोस्ट केले असून कॅप्शनमध्ये लिहिले की 'माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस. गेल्या 12 वर्षांपासून मी तुझ्याकडे (कॅलिसकडे) परिपूर्ण क्रिकेटपटू आणि माझा आदर्श म्हणून पाहात आलो आहे. अखेर मला तुला भेटण्याची आज संधी मिळाली.'

'माझे पालक जेव्हाही मला माझ्या आवडत्या ठिकाणाबद्दल विचारायचे, तेव्हा मी त्याला भेटू शकेन याच आशेवर दक्षिण आफ्रिका सांगायचो. मी नेहमीच तुझा चाहता राहिलो आहे आणि तू नेहमीच माझे प्रेरणास्थान राहिला आहेस.'

कॅलिस दक्षिण आफ्रिकेसाठी 1995 ते 2014 दरम्यान आंतरराष्ट्रीय खेळला. त्याने 519 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 25534 धावा केल्या, तसेच 577 विकेट्स घेतल्या आहेत. तो नेहमीच दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणला गेला आहे.

अर्शिनकडून मोठ्या अपेक्षा

अर्शिनने गेल्या काही दिवसात 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून चांगली कामगिरी केली नाही. नुकतेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह पार पडलेल्या तिरंगी मालिकेतही त्याची कामगिरी चांगली राहिली.

त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 जानेवारीला झालेल्या सामन्यात 91 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्सही घेतल्या होत्या. तो 19 वर्षांखालील आशियाई चषक स्पर्धेतही चांगला खेळला होता. तो भारताकडून सलामीला फलंदाजी करण्याबरोबरच वेगवान गोलंदाजीही करतो.

त्याचा सध्याचा चांगला फॉर्म पाहाता त्याच्याकडून आगामी 19 वर्षांखालील विश्वचषकातही चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT