Rahul Dravid Son: U19 क्रिकेट गाजवत असलेल्या लेकाला द्रविड का देत नाही कोचिंग, स्वत:च केला खुलासा

Samit Dravid: राहुल द्रविड स्वत:च्याच मुलाला प्रशिक्षण न देण्यामागील कारण सांगितले आहे.
Rahul Dravid
Rahul DravidX/BCCI
Published on
Updated on

Why Rahul Dravid do not try to coach son Samit?

भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे, तो आता गेली दोन-अडीच वर्षापासून भारतीय संघाला मार्गदर्शन करत आहे. त्याआधी त्याने भारताच्या अनेक युवा खेळाडूंनाही मार्गदर्शन केले आहे. पण असे असले तरी त्याचा मोठा मुलगा समीतला मात्र तो प्रशिक्षण देत नाही, यामागील कारणही त्यानेच स्पष्ट केले आहे.

द्रविडचा मुलगा समीत 18 वर्षांचा असून कर्नाटकच्या 19 वर्षांखालील संघाकडून खेळतो. सध्या तो कुच-बिहार ट्रॉफी या 19 वर्षांखालील प्रथम श्रेणी स्पर्धेत खेळत आहे. समीत अष्टपैलू खेळाडू आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो.

Rahul Dravid
Virat Kohli-Rahul Dravid Photo: 'कल्पना केली नव्हती...', द्रविडबरोबर फोटो शेअर करत विराटने लिहिली इमोशनल पोस्ट

द्रविडने नुकताच त्याचा 51 वा वाढदिवस 11 जानेवारी रोजी साजरा केला. त्याचदिवशी मोहालीत भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी20 सामना खेळला. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर द्रविड ब्रॉडकास्टर जिओ सिनेमाशी बोलत होता, त्यावेळी समालोचन करणाऱ्या सुरेश रैनाने त्याला त्याच्या मुलाबद्दल प्रश्न विचारला.

यावेळी द्रविडने गमतीशीर उत्तर दिले. द्रविड म्हणाला, 'समीतला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करत नाही. पालक आणि प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिका निभावणं कठीण आहे. पालकच राहण्याचाच प्रयत्न करत आहे, त्यातही माहित नाही मी काय करतोय.'

Rahul Dravid
Rahul Dravid: मैदानात टीम इंडियाची फटकेबाजी, पण लक्ष वेधलं ड्रेसिंग रुममधील द्रविडने! असं काय घडलं, पाहा

दरम्यान, समीत वयोगटातील क्रिकेटमध्ये मात्र सध्या कमालीचा खेळ करत आहे. सध्या तो कुच-बिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध खेळत असून हा सामना कर्नाटकच्या केएससीए नवुले स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाविरुद्ध समीतने 19 षटके गोलंदाजी करताना 60 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

त्याने या स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी त्याने 7 सामन्यात 340 धावा केल्या आहेत. तसेच 14 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com