Sumit Nagal X/AustralianOpen
क्रीडा

Sumit Nagal: भारताचा सुमीत नागल खेळणार ऑस्ट्रेलियन ओपन, स्लोव्हाकियाच्या प्रतिस्पर्ध्याला नमवत मिळवलं तिकीट

Australian Open 2024: भारताचा सुमीत नागल ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Pranali Kodre

Sumit Nagal qualified for Australian Open 2024 main draw:

भारताचा टेनिस स्टार सुमीत नागलने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवले असून मुख्य स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.

त्यामुळे 26 वर्षीय नागल आता 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मुख्य ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. ही वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा असते.

शुक्रवारी पात्रता फेरीत नागलने स्लोव्हाकियाच्या ऍलेक्स मोल्कनला 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. आता त्याचा मुख्य स्पर्धेतील पहिल्या फेरीचा सामना 15 जानेवारीला कझाकस्तानच्या ऍलेक्झँडर बब्लिकविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, नागलने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य स्पर्धेत खेळण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे, तसेच एकूण ग्रँडस्लॅम मुख्य स्पर्धेत खेळण्याची चौथीच वेळ असणार आहे. तो यापूर्वी 2021 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी त्याला पहिल्या फेरीत रिकार्डास बारान्किसविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता.

त्याआधी तो 2019 साली अमेरिकन ओपन स्पर्धा खेळला होता, ज्या स्पर्धेत त्याचा सामना दिग्गज रॉजर फेडरर विरुद्ध झाला होता. या सामन्यात फेडररकडून त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. सुमीत 2020 साली देखील तो अमेरिकन ओपन खेळला होता, ज्यात त्याने दुसऱ्या फेरीपर्यंत धडक मारली होती.

नागलचा मोल्कनविरुद्ध विजय

जागतिक क्रमवारीत 139 क्रमांकावर असलेल्या नागलने पहिल्या सेटमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. त्याने 3-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर त्याची लय बिघडली. त्याने अनेक अनफोर्स एरर केले. मोल्कनने नंतर 3-3अशी बरोबरीही केली होती. मात्र, नागलने पुन्हा पुनरागमन करत हा सेट 6-4 ने 51 मिनिटात जिंकला.

दुसऱ्या सेटदरम्यान मोल्कनने त्यांच्या खांद्याच्या दुखापतीसाठी उपचार घेतले होते. इतकेच नाही, तर नागलनेही माकडहाडाच्या वेदनेमुळे मेडिकल टाईम-आऊट घेतला होता. पण नंतर तो लगेचच त्यातून सावरला आणि नागलने हा सेटही जिंकत सामना जिंकला. याबरोबरच मुख्य स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT