Smith vs Djokovic: जेव्हा क्रिकेटर स्मिथ 24 ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचला टेनिस कोर्टवर देतो टक्कर, पाहा Video

Australia Open 2024: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टिव्ह स्मिथचा रिटर्न पाहून टेनिस स्टार नोवाक जोकोविचही आवाक झाला होता.
Steve Smith - Novak Djokovic
Steve Smith - Novak DjokovicX/AustralianOpen
Published on
Updated on

Steve Smith stunns Novak Djokovic with his Tennis Skill ahead of Australian Open 2024

येत्या 14 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन 2024 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या मुख्य स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मेलबर्न पार्कवर एक प्रदर्शनिय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही समावेश होता.

विशेष गोष्ट अशी की स्मिथला 24 ग्रँडस्लॅम विजेत्या नोवाक जोकोविचबरोबर टेनिस खेळण्याची संधीही मिळाली. जोकोविच यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 25 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

Steve Smith - Novak Djokovic
AUS vs PAK: नया है यह! स्मिथने केली तक्रार अन् टेपच्या एका गोळ्यामुळे थांबवला सामना, पाहा Video

सेंटर कोर्टवर स्मिथ आणि जोकोविच टेनिस खेळताना दिसले. त्यांचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडेलवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये दिसते की जोकोविचच्या सर्व्हवर स्मिथने त्याचे फुटवर्क वापरत शानदार रिटर्नचा फटका मारला. ते पाहून जोकोविचही आवाक झाला आणि त्याने स्मिथचे कौतुक केले. यावेळी स्मिथही हसला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की स्मिथला क्रिकेटव्यतिरिक्त टेनिस हा खेळही आवडतो. तो लहानपणी क्रिकेटबरोबर टेनिसही खेळायचा.

दरम्यान, जोकोविचने नंतर क्रिकेट खेळण्याचाही आनंद टेनिस कोर्टवर घेतला. मात्र त्याला क्रिकेट बॅटने चेंडू मारता आला नाही. म्हणून मग त्याने टेनिस रॅकेटचा वापक करत चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावला. हे व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Steve Smith - Novak Djokovic
Novak Djokovic: बापरे! तब्बल 5 वर्षानंतर जोकोविच ऑस्ट्रेलियात पराभूत, 24 वर्षीय खेळाडूचा धक्कादायक विजय

जोकोविच खेळणार ऑस्ट्रेलियन ओपन

जोकोविचने आत्तापर्यंत 24 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तो ऑस्ट्रेलियन ओपनचा गतविजेताही आहे. त्यामुळे यंदा तो हे विजेतेपद राखण्याच्या प्रयत्नात असेल. जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021 आणि 2023 साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.

स्मिथ खेळणार वेस्ट इंडिज विरुद्ध

सध्या वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात 17 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तसेच नंतर वनडे आणि टी20 मालिकाही होणार आहे. या मालिकांमध्ये स्मिथ खेळताना दिसणार आहे. तो वनडे मालिकेत पॅट कमिन्स विश्रांतीवर असल्याने ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही करताना दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com