टी20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2021) टीम इंडियाचा (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) प्रशिक्षक रवी शास्त्री (Coach Ravi Shastri) यांच्यासह इतर कोचिंग स्टाफ असणार नाही. कारण शास्त्रींचा करार टी20 विश्वचषकानंतर संपणार आहे (Ravi Shastri's contract will end). भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापर्यंत करार वाढवण्याची दिलेली ऑफर शास्त्री यांनी नाकारली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत एक नवीन प्रशिक्षक असेल.
स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे की, टी 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांनी बीसीसीआयचा करार वाढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्ज मागवू शकते.
राहुल द्रविड प्रशिक्षक होण्याची शक्यता कमी आहे
राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख पद सांभाळत आहे, त्यामुळे द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार नाही, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. मात्र, त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संपर्क करण्यात आला की नाही, याविषयी माहित उपलब्ध झाली नाही.
रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत
रवी शास्त्री 2017 पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्याचा करार टी२० विश्वचषकानंतर संपत आहे. रवी शास्त्री आणि विराट यांच्यामध्ये टीम इंडियाने कसोटीत परदेशी भूमीवर चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिका जिंकली. दुसरीकडे, इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पुढे आहे. या संघाने प्रथमच आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. मात्र, न्यूझीलंडकडून संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
द. आफ्रिका दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळले जाणार सामने
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि चार टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून सुरू होईल. त्याचबरोबर शेवटचा टी -20 सामना 2022 मध्ये 26 जानेवारीला खेळला जाणार, त्यानंतर दौऱ्याचा शेवट असेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.