IPL 2021: MI च्या गाण्याने मराठी माणसाची छाती फुलेल अभिमानाने, पाहा VIDEO

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
IPL 2021: Mumbai Indians new song with Marathi swag
IPL 2021: Mumbai Indians new song with Marathi swagDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आयपीएल 2021 (IPL 2021) चा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, भारतात खेळल्या गेलेल्या पहिल्या लेगमधील 29 सामन्यांनंतर कोविडमुळे (COVID-19) स्पर्धा पुढे ढकलावी लागली होती. आता उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तीन मैदानावर खेळले जातील. यूएईच्या भूमीवर गेल्या वर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) सज्ज झाला आहे. आता या सीझनच्या दुसऱ्या लीगगपूर्वी मुंबई इंडियन्सने एक नवीन व्हिडिओ लाँच केला आहे.(IPL 2021: Mumbai Indians new song with Marathi swag)

मुंबई इंडियन्सने बुधवारी आपल्या प्रचाराच्या गाण्याचा व्हिडिओ लाँच केला. यात एकता आणि संस्कृतीचे चित्रण आहे. व्हिडिओ पोस्टमध्ये मुंबई इंडियन्सच्या नावासह लिहिले आहे - 'महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा अभिमान' या व्हिडिओमध्ये रोहित शर्मासह संघातील सर्व दिग्गज आणि युवा खेळाडू दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये खेळाडू जबरदस्त नाचताना देखील दिसत आहेत.

मुंबई पल्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात 7 सामने खेळला. या सामन्यांमध्ये मुंबईने 4 जिंकले तर तीन सामने गमावले. ते 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दुबईच्या मैदानावर खेळणार आहे.

IPL 2021: Mumbai Indians new song with Marathi swag
IPL 2021चे सामने आता स्टेडियममध्ये बसून पहा, तिकीट विक्रीची तारीख जाहीर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com