Shahbaz Nadeem announced retirement X/ICC
क्रीडा

Shahbaz Nadeem: भारताच्या 34 वर्षीय फिरकीपटूची अचानक निवृत्तीची घोषणा, कारकिर्दीत घेतल्यात 750 पेक्षा अधिक विकेट्स

Pranali Kodre

India's Shahbaz Nadeem announced retirement from Cricket

झारखंडचा अनुभवी क्रिकेटपटू शाहबाज नदीमने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो गेली दोन दशके भारतीय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. मात्र भारताकडून त्याला दोनच सामने खेळण्याची संधी मिळाली.

डावखुरा फिरकीपटू असलेल्या शाहबाझने २ कसोटी सामने भारताकडून खेळताना ८ विकेट्स घेतल्या आहेत. असे असले तरी त्याचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र मोठे नाव होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने या रणजी हंगामात राजस्थानविरुद्ध अखेरचा सामना खेळला. दरम्यान, तो आता भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर जगभरातील टी२० लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. दरम्यान, त्याच्यापूर्वी झारखंडच्या सौरभ तिवारी आणि वरुण ऍरॉन यांनीही त्याच्याआधीच निवृत्ती घेतली आहे.

शाहबाझने इएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की 'मी बरेच दिवस निवृत्तीच्या निर्णयाबद्दल विचार करत होतो. मी निर्णय घेतला आहे की मी तिन्ही क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेत आहे. मला नेहमी असे वाटते की जर तुमच्यासमोर कोणते ध्येय असेल, तर तुम्ही नेहमीच तुम्हाला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देता.'

'तथापि, मला आता माहित आहे की भारतीय संघात मला जागा मिळणार नाही, त्यामुळे हेच योग्यआहे की मी युवा खेळाडूंना संधी द्यावी. त्याचबरोबर मी आता जगभरातील टी२० लीगमध्ये खेळण्याचा विचार करत आहे.'

त्याचबरोबर त्याने असेही म्हटले की गेल्या २० वर्षांपासून तो झारखंडकडून खेळत असून जरी त्याने रणजी ट्रॉफी जिंकली नसली, तरी एक मजबूत संघ आता तयार झाला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंड संघाला यापुढे कोणीही हलक्यात घेत नाही.

तसेच त्याने म्हटले की आता युवा खेळाडूंकडे जबाबदारी सोपवण्याची वेळ आली असून खात्री आहे की ते आगामी काळात मोठ्या स्पर्धा जिंकतील.

शाहबाझने २००४ मध्ये झारखंडसाठी पदार्पण केले होते. तो २०१५-१६ आणि २०१६-१७ रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाराही गोलंदाज होता. त्याने २०१८ मधील विजय हजारे ट्रॉफीमध्येही सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने भारतीय अ संघाचेही प्रतिनिधित्व केले अशून ८३ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये ४१६ विकेट्स घेतल्या आहेत.

शाहबाझने आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ७२ आयपीएल सामने खेळले असून ४८ विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत १४० प्रथम श्रेणी सामने खेळले असून ५४२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच १३४ लिस्ट ए सामन्यांत १७५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १५० टी२० सामने खेळले असून १२५ विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT