IND vs ENG: इंग्लिश खेळाडूंची हिमाचलच्या दरी-खोऱ्यांतून सैर, तर वाहत्या थंडगार पाण्यातही मारली डुबकी, Video व्हायरल

England Cricketers explore Himachal Pradesh: भारताविरुद्धचा पाचवा कसोटी धरमशालेत होणार असून त्याआधी इंग्लंडच्या खेळाडूंनी हिमाचलमधील वातावरणाचा आनंद लुटला आहे.
England Cricketers explore Himachal Pradesh
England Cricketers explore Himachal PradeshInstagram

England players enjoy some downtime in Himachal Pradesh

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना धरमशाला येथे होणार आहे. या सामन्याला ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू धरमशाला येथे पोहचले आहेत.

दरम्यान, इंग्लंडचे खेळाडू हिमाचल प्रदेशमधील वातावरणाची मजाही घेताना दिसत आहेत. याचे काही व्हिडिओ इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने शेअर केले आहेत.

England Cricketers explore Himachal Pradesh
IND vs ENG 5th Test: धरमशालामध्ये भारताला मोठी संधी; टीम इंडिया करणार 112 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी?

स्टोक्सने सकाळी हिमाचलच्या सुंदर परिसरात इंग्लंडचे खेळाडू रनिंगला गेले असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

तसेच जेम्स अँडरसनने हिमाचलच्या खोऱ्यांमधील वाहत्या नितळ पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अँडरसनबरोबर इंग्लंड संघातील इतर खेळाडूही आहेत.या व्हिडिओला अँडरसनने कॅप्शन दिले आहे की 'रिकव्हरीसाठी एक सुंदर ठिकाण.'

दरम्यान, इंग्लंड संघ हिमाचल प्रदेशचा असा आनंद लुटतानाचे हे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

England Cricketers explore Himachal Pradesh
IND vs ENG: यशस्वी जयस्वाल बनणार 'सिक्सर किंग'; बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलमचा मोडणार रेकॉर्ड

इंग्लंडने गमावली मालिका

दरम्यान, इंग्लंडने भारताविरुद्ध सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. परंतु, नंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत दुसरा, तिसरा आणि चौथा सामना जिंकत मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली आणि मालिकाही खिशात टाकली आहे.

दरम्यान गेल्या 12 वर्षांत भारताने मायदेशात कसोटी मालिकेत अपराजित राहिला आहे. आता इंग्लंडचा पाचवा सामना जिंकून भारत दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. तसेच भारतीय संघही आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com