IND vs ENG: 'ती माझी ताकद...', बेअरस्टो धरमशालेत खेळणारा 100 वा सामना आईला केला समर्पित

Jonny Bairstow 100th Test: धरमशाला येथे होणारा भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना जॉनी बेअरस्टोचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असून त्याने हा सामना आईला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jonny Bairstow 100th Test
Jonny Bairstow 100th TestX/ICC
Published on
Updated on

Jonny Bairstow dedicated 100th Test Match :

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणार आहे. हा सामना इंग्लंड यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी खास असणार आहे. कारण हा त्याचा कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे.

34 वर्षीय बेअरस्टोने त्याच्या कारकिर्दीतील हे यश त्याच्या आईला समर्पित केले आहे. त्याची आई त्याच्या प्रवासातील त्याची सर्वात मोठी ताकद राहिली आहे.

बेअरस्टोचे वडील डेव्हिड बेअरस्टो हे देखील इंग्लंडसाठी क्रिकेट खेळले असून ते देखील यष्टीरक्षक फलंदाज होते. पण त्यांनी निवृत्तीनंतर वयाच्या 46 व्या वर्षी आत्महत्या केली. त्यावेळी जॉनी बेअरस्टो अवघा 8 वर्षांचा होता.

अशा कठीण परिस्थितीत त्याच्या आईने त्यांच्या कुटुंबाला सांभाळले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या आईने दोनवेळा स्तनाच्या कर्करोगावरही मात केली आहे.

Jonny Bairstow 100th Test
Bairstow Run-Out: "...त्यापेक्षा स्मार्टनेसचं कौतुक करा", बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटच्या चर्चेत अश्विनचीही उडी

त्याच्या प्रवासाबद्दल बोलताना बेअरस्टोने टेलिग्राफ स्पोर्ट्सला सांगितले की 'जेव्हाही मी खेळतो, तेव्हा अनेकदा वडिलांचा विचार येतो. पण मी आईने जे काही झाली, त्यानंतर आम्ही ठिक रहावे, यासाठी किती कष्ट केले, याचा जास्त विचार करतो. आम्हाला एक कुटुंब म्हणून एकत्र तिने ठेवले. ती माझी ताकद आहे.'

'तीने समर्पण शिकवले. ती तीन वेगवेगळ्या नोकऱ्या करायची आणि त्यावेळी 10 पेक्षाही कमी वय असलेली दोन मुलांना तिला सांभाळचे होते. ती मला लीड्स युनायटेड ते हेडिंग्ले अशा अनेक ठिकाणी घेऊन जायची. आता त्या सर्व गोष्टींचे चीज होत आहे.'

बेअरस्टोने सांगितले, 'तिला दोनदा कर्करोगाने ग्रासले. ती खूप भक्कम स्त्री आहे. तिने दोनवेळा त्याचा सामना केला. तिने स्त्री म्हणून काय ताकद आणि समर्पण असते, ते दाखवले आहे.'

बेअरस्टो त्याच्या वडिलांबद्दल म्हणाला की ते वर बसून बिअर हातात घेऊन अभिमानाने पाहात असतील.

Jonny Bairstow 100th Test
Bairstow Run-Out: पाय घासून पुढं आला तरी बेअरस्टो रनआऊट कसा झाला? नियम नक्की आहे काय?

त्याचबरोबर त्याने असेही सांगितले की त्याला नेहमीच कसोटी क्रिकेटपटू व्हायचे होते. तो म्हणाला, 'मी वनडे क्रिकेट पाहून मोठा झालेलो नाही, मी कसोटी क्रिकेट पाहत मोठा झालो. ते माझ्यासाठी सर्वकाही आहे. मला मायकल वॉन, मार्कस ट्रेस्कोथिक, केविन पीटरसन आवडायचे.'

'मला आठवते मी हेडिंग्लेला गेलो असताना इंग्लंडचे नेट सेशन सुरू होते. तेव्हा त्यांनी ते वोडाफोनचे निळ्या रंगाचे ट्रॅकसुट घातले होते. मी ते पाहून भारावलो होतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली होती आणि मला त्याचा भाग होण्याची तीव्र इच्छा होती.'

100 व्या कसोटीबद्दल बेअरस्टो म्हणाला, 'हा खूप भावनिक आठवडा असणार आहे. मला याचा आनंद घ्यायचा आहे. मी खेळाडूंबरोबर आणि जगभरातील चाहत्यांसाठी चांगली कामगिरी करू इच्छितो.'

बेअरस्टो इंग्लंडकडून 100 कसोटी खेळणारा 17 वा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी इंग्लंडच्या 16 खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com