Shubman Gill - Axar Patel X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: गिलच्या शतकानंतरही टीम इंडिया 255 धावांत सर्वबाद, इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य

India vs England, 2nd Test: दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs England, 2nd Test Match at Visakhapatnam:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमला शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 78.3 षटकात 255 धावांवर संपुष्टात आला.

पण पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीसह भारताने इंग्लंडसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात शुभमन गिलने शतकी खेळी केली.

भारताकडून दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालला फारशी चांगली सुरुवात देता आली नाही. या दोघांनाही 10 षटकांच्या आतच इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने बाद केले.

कर्णधार रोहितने 13 धावा केल्या, तर पहिल्या डावात द्विशतक झळकावलेल्या यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावात 17 धावांवर बाद झाला.

मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला होता. गिल सुरुवातीलाच बाद होण्यापासून बचावला होता, याचा फायदा त्याने घेतला आणि आक्रमक फलंदाजी केली. गिलने अय्यरबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, अय्यर पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही मैदानात स्थिरावल्यानंतर बाद झाला. त्याला 29 धावांवर टॉम हर्टलीने बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले. स्टोक्सने मागे पळत जात अय्यरचा सुरेख झेल टिपला. त्यापाठोपाठ 31 व्या षटकात रजत पाटीदारही 9 धावांवर माघारी परतला.

मात्र त्यानंतर गिलने अक्षर पटेलला साथीला घेतले. या दोघांनी भारताचा डाव पुढे नेताना 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. दरम्यान, गिलने त्याचे तिसरे कसोटी शतकही पूर्ण केले.

मात्र शतकानंतर गिल 56 व्या षटकात बाद झाला. त्याला शोएब बशीरने बाद केले. त्याचा झेल बेन फोक्सने घेतला. त्याच्या विकेटसाठी इंग्लंडने डीआरएसचा वापर केला होता. त्यांनी घेतलेला रिव्ह्यू योग्य ठरला आणि त्यामुळे गिल 104 धावांवर बाद झाला. गिलने 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह ही खेळी केली.

गिल बाद झाल्यानंततर मात्र भारताचा डाव कोलमडला. त्याच्यानंतर अक्षर पटेलही 45 धावांवर टॉम हर्टलीविरुद्ध पायचीत झाला. पाठोपाठ केएस भरत (6) आणि कुलदीप यादवही (0) झटपट बाद झाले.

त्यानंतर आर अश्विनने झुंज देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जसप्रीत बुमराहने बचावात्मक खेळत त्याला साथ दिली. मात्र अखेर बुमराह देखील 26 चेंडूत एकही धाव न करता बाद झाला. अखेर 79 व्या षटकात आर अश्विनला रेहान अहमदने बाद करत भारताचा डाव संपवला. अश्विन 29 धावांवर बाद झाला.

या डावात इंग्लंडकडून टॉम हर्टलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच रेहान अहमदने 3 विकेट्स घेतल्या, तर जेम्स अँडरसनने 2 विकेट्स आणि शोएब बशीरने 1 विकेट घेतली.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 396 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 253 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला 143 धावांची आघाडी मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT