Ravindra Jadeja - Rohit Sharma Century AFP
क्रीडा

IND vs ENG, 3rd Test: रोहित-जडेजाचा शतकी दणका, तर सर्फराजचीही आक्रमक फिफ्टी; पहिल्या दिवशी भारताच्या 300 धावा पार

India vs England, 3rd Test: राजकोटमध्ये सुरू असलेल्या कसोटीत भारताकडून पहिल्या दिवशी रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी शतके केली. तसेच पदार्पणवीर सर्फराज खानने अर्धशतक झळकावले.

Pranali Kodre

India vs England, 3rd Test Match at Rajkot, 1st Day

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला गुरुवारी (15 फेब्रुवारी) सुरूवात झाली. राजकोटमधील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 86 षटकात 5 बाद 326 धावा केल्या आहेत.

पहिल्या दिवशी भारताकडून रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांनी शतके केली, तर सर्फराजने अर्धशतक केले. पहिल्या दिवशी गोलंदाजीत मार्क वूड चमकला.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रोहितसह यशस्वी जयस्वाल भारताकडून पहिल्या डावात सलामीला फलंदाजीला उतरले. जयस्वालने दोन चौकार ठोकत चांगली सुरूवात केली होती.

मात्र मार्क वूडने सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली होती. त्याने जयस्वालला 10 धावांवर चौथ्याच षटकात माघारी धाडले. जयस्वालचा झेल स्लीपमध्ये जो रुटने पकडला. त्यानंतर लगेचच सहाव्या षटकात शुभमन गिलही 9 चेंडूत एकही धाव न करता मार्क वूडच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल यष्टीरक्षक बेन फोक्सने पकडला.

यानंतर रजत पाटीदारने कर्णधाराला साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाटीदारला 5 धावांवर टॉम हर्टलीने माघारी धाडले. त्यामुळे 33 धावातच 3 विकेट्स गमावल्याने भारताला मोठा धक्का बसला होता.

परंतु, पाचव्या क्रमांकावर बढतील मिळालेल्या जडेजाने रोहितला भक्कम साथ दिली. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना फार वरचढ होऊ दिले नाही. दरम्यान, रोहितला अनेकदा बाद करण्याच्या संधी इंग्लंडला मिळाल्या, मात्र तो सुदैवी ठरला.

रोहितने तिसऱ्या सत्रात्या सुरुवातीलाच त्याचे 11 वे कसोटी शतकही पूर्ण केले. पण शतकानंतर तो बाद झाला. त्याला वूडनेच माघारी धाडले. रोहितने 196 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांसह 196 धावा केल्या. त्याच्यात आणि जडेजामध्ये 204 धाावंची भागीदारीही झाली.

रोहित बाद झाल्यानंतर सर्फराज फलंदाजीला आला होता. यावेळी त्याला वूडने सुरुवातीला संघर्ष करायला लावला. परंतु, खेळपट्टीवर स्थिरावल्यावर सर्फराजने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने फिरकीपटूंविरुद्ध आक्रमण केले. यावेळी दुसरी बाजू जडेजाने सांभाळली होती.

सर्फराजने 48 चेंडूत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. परंतु, 82 व्या षटकात जडेजा 99 धावांवर असताना एकेरी धावेसाठी त्याने कॉल दिला होता. ते पाहून नॉन-स्ट्रायकरवर असलेला सर्फराज पळाला, परंतु तो पुढे आलेला असतानाच जडेजाने पुन्हा धावेसाठी नकार दिला.

यावेळी मार्क वूडने सर्फराज पुन्हा क्रिजमध्ये पोहचल्यापूर्वीच स्टंपवरील बेल्स उडवले. त्यामुळे सर्फराजला 66 चेंडूत 62 धावा करून धावबाद होत माघारी परतावे लागले. त्यामुळे कुलदीप यादव नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आला.

यावेळी सर्फराज बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर जडेजाने शतक केले. परंतु, त्याने जोरदार सेलिब्रेशन केले नाही. दरम्यान, जडेजा आणि कुलदीपने आणखी विकेट जाऊ दिली नाही. जडजा 212 चेंडूत 110 धावांवर नाबाद आहे, तर कुलदीप 1 धावेवर नाबाद आहे. यादरम्यान जडेजाने कसोटी कारकिर्दीत 3000 धावाही पूर्ण केल्या.

दरम्यान इंग्लंडकडून गोलंदाजी करताना पहिल्या दिवशी मार्क वूडने 3 विकेट्स घेतल्या, तर टॉम हर्टलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT