Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: भारताची वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक! मोहम्मद शमीच्या 7 विकेट्स; न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 397 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात डॅरिल मिशेलच्या शतकानंतरही न्यूझीलंडचा संघ 48.4 षटकांत 10 विकेट्स गमावून 327 धावाच करु शकला.

भारताकडून (India) मोहम्मद शमीने 7 विकेट्स घेतल्या. भारताने यापूर्वी 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, जिथे त्याने विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.

यानंतर 2015 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता, तर 2019 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने उपांत्य फेरीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

दरम्यान, 398 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच शमीने दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कॉनवे 13 धावा करुन बाद झाला तर रचिन 13 धावा करुन बाद झाला.

यानंतर केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 149 चेंडूत 181 धावांची भागीदारी झाली. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एकाच षटकात दोन विकेट घेत भारताचे पुनरागमन केले. केन विल्यमसन 73 चेंडूत 69 धावा करुन बाद झाला.

टॉम लॅथमला खातेही उघडता आले नाही. डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यात 75 धावांची भागीदारी झाली. मात्र, बुमराहने फिलिप्सला बाद करत भागदारी मोडली.

ग्लेन फिलिप्स 33 चेंडूत 41 धावा करुन बाद झाला. बुमराहला पहिली विकेट मिळाली. शमीने विक्रमी सात विकेट घेतल्या.

दुसरीकडे, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत चार विकेट्स गमावून 397 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी झाली. कर्णधार रोहित शर्मा 29 चेंडूत 47 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

शुभमन गिल 79 च्या वैयक्तिक स्कोअरवर रिटायर्ड हर्ट झाला, त्यानंतर तो बॅटिंगला परतला आणि 80 च्या वैयक्तिक स्कोअरवर नाबाद परतला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतके झळकावली आहेत, तर विराट कोहलीच्या नावावर आता 50 शतके आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात 113 चेंडूत 117 धावा करुन विराट कोहली बाद झाला.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात 163 धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यर 105 धावा करुन बाद झाला. केएल राहुलने 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. मात्र, सूर्यकुमारला एकच धाव करता आली.

आयसीसी नॉकआऊटमध्ये भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला

आयसीसी नॉकआऊटमध्ये भारतीय संघाला पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध विजयाची नोंद करण्यात यश आले आहे. याआधी भारत तीन वेळा पराभूत झाला होता. 2000 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

आता भारतीय संघाने या तीन पराभवांचा बदला घेत न्यूझीलंडचा पराभव करत चौथ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी भारताने 1983, 2003 आणि 2011 मध्ये अंतिम सामना खेळला होता.

ज्यामध्ये भारत 1983 आणि 2011 मध्ये विश्वविजेता ठरला होता. आता 19 नोव्हेंबरला भारताचा उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed: मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

सातारा-सोलापूर महामार्गावर 48 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त, 5 जणांना बेड्या; महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT