Team India News | Cricket News Updates Dainik Gomantak
क्रीडा

'आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप' पॉइंट्स टेबलमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेच्या खाली

ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानावर

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने बंगळुरू कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 238 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 222 धावांनी पराभव केला होता. (Team India New updates)

भारताला बंगळुरू कसोटी सामन्यातील विजयाचा फायदा झाला आहे. टीम इंडिया (Team India) आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. 2021-23 कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताला अजून सात सामने खेळायचे आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर बाबर आझमच्या पाकिस्ताननेही (Pakistan) आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाचे आतापर्यंत 11 पैकी सहा सामने जिंकले असून 77 गुण मिळवले आहेत. मात्र, भारत अजूनही पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) या संघांच्या मागे आहे.

गुणांचे वाटप
कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतात. त्याचवेळी, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टाय झाल्यास 50 टक्के, ड्रॉ झाल्यास 33.33 टक्के आणि हरल्यास शून्य टक्के गुण जोडले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

SCROLL FOR NEXT